कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 4, 2025 at 06:18 AM
                               
                            
                        
                            *शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ आणि उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर महत्त्वपूर्ण बैठक !* 
*दि. ०३ फेब्रुवारी २०२५, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व  उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी #कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अनिवार्य आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागाशी समन्वय करून #एआय प्रकल्पांची तांत्रिक, आर्थिक व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले.*
राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (दूरदृष्यप्रणालीद्वारे), सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अखिल भारतीय द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष कैलास पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे (व्यय) प्रधान सचिव सौरभ विजय, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त श्री. सुरज मांढरे, साखर आयुक्त श्री. कुणाल खेमनार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक श्री. परिमल सिंग, सहकार विभागाचे सहसचिव श्री.संतोष पाटील, कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण श्री. रफिक नाईकवाडी, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. निलेश नलावडे, प्रा. योगेश फाटके, प्रा. तुषार जाधव, प्रा. शरद ताटे उपस्थित होते.
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                    
                                        6