Ajit Pawar

45.4K subscribers

Verified Channel
Ajit Pawar
February 11, 2025 at 11:24 AM
तुमच्या-आमच्या हक्काच्या सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले काही महत्त्वपूर्ण निर्णय : ✅ देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघरसाठी २५९९.१५ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली. प्रकल्पातून ६९.४२ दलघमी पाणीसाठा वसई-विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवला जाईल. ✅ जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना ता. दौंड, बारामती आणि पुरंदर जि. पुणे योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत ४३८.४८ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. - जनाईतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागात ८३५० हेक्टरला सिंचन. - शिरसाईतून बारामती, पुरंदरच्या अवर्षण भागात ५७३० हेक्टरला सिंचन. ✅ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांत २०१९ मध्ये दुरुस्ती करणार. https://x.com/ajitpawarspeaks/status/1889272939574423573?s=46
❤️ 👍 🙏 15

Comments