Ajit Pawar
45.4K subscribers
Verified ChannelAbout Ajit Pawar
संकल्प, निष्ठा, कर्म- हाच माझा धर्म! उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य | Commitment, Conviction, Service- My Vision | Deputy Chief Minister- Maharashtra
Similar Channels
Swipe to see more
Posts
आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मुंबईत आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत सहभागी झालो. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या अभिमानानं, स्वाभिमानानं आणि सन्मानानं पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त गौरवमुर्तींचं मनापासून अभिनंदन केलं तसंच मराठी भाषा जगवण्यात, ती फुलवण्यात व प्रचार-प्रसारात भरीव योगदान दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. याचबरोबर मराठी भाषेला साहित्याच्या सर्वोच्च शिखरावर नेणारे कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्रपूर्वक अभिवादन केलं. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा वारसा, सीमा भागाचा स्वाभिमान जपणारी, छत्रपती शिवाजी महाराजांची, माझी, तुमची, आपणा सर्वांच्या मायमराठीला हजारो वर्षांची समृद्ध, गौरवशाली परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता माळी, संत नरहरी सोनार यांच्यासारख्या संतांनी त्यांचे अलौकिक विचार मराठी भाषेत मांडले. साहित्यिक वि. स. खांडेकर, कविवर्य कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, पु.ल. देशपांडे, भालचंद्र नेमाडे, कवयित्री शांता शेळके, बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यकृतींनी मराठी साहित्याचा झेंडा उंच केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिलाच मराठी भाषा गौरव दिन आहे. त्यामुळं त्याचं महत्त्व अत्यंत आगळं-वेगळं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी साहेब आणि मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो. मुंबईत मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरु आहे. 'पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’च्या नूतनीकृत अकादमी संकुलाचं काम पुर्ण झालं आहे. मराठी साहित्य, नाट्य संस्कृतीला चालना देणारं रविंद्र नाट्य मंदिर दिमाखदार पध्दतीनं पुन्हा आपल्या सेवेत येत आहे, याचा मला आनंद आहे. आपली मायमराठी भाषा नुसती जपायची नाही, तर ती पुढे नेण्यासाठी नव्या पिढीमध्ये तिची आवड निर्माण करायची आहे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येक मराठी माणसानं आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला, तरच ती पुढे जाईल. चला, आजच्या या मराठी भाषा गौरव दिनी आपण एक संकल्प करू. “मराठी भाषा वाचण्यासाठी, वाढवण्यासाठी, संवर्धनासाठी आणि तिला अभिमानानं पुढे नेण्यासाठी प्रयत्न करूया.” ‘माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन, दीन, स्वर्गलोकाहून थोर, मला तिचा अभिमान...’
देशभरातील शीख बांधवांचे श्रद्धास्थान,नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब या पवित्र गुरुद्वारा येथे भेट देऊन दर्शन घेतले.