Ajit Pawar

45.4K subscribers

Verified Channel
Ajit Pawar
February 16, 2025 at 02:38 PM
नाशिक येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई अंतर्गत नाशिक रोड येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ई-लायब्ररी केंद्राचं देखील उद्घाटन झालं. या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित सर्व न्यायालयीन अधिकारी, ज्येष्ठ व नवोदित वकील तसंच न्यायव्यवस्थेशी संबंधित असोसिएशनच्या मान्यवरांशी संवाद साधला. न्यायव्यवस्थेचा विस्तार आणि सुधारणा हा कोणत्याही प्रगतशील समाजाचा मुख्य आधार असतो. याच दृष्टीनं नाशिक रोड येथील या नव्या न्यायालयीन वास्तूच्या माध्यमातून नाशिक आणि आसपासच्या भागातील सर्व पक्षकारांच्या प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा होईल. स्थानिक नागरिकांना न्यायासाठी आणि स्थानिक वकिलांना न्यायालयीन कामकाजासाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही. तसंच न्यायप्रक्रियेत गतिमानता येईल, न्यायव्यवस्था आणखी सशक्त होईल आणि एकंदरीत पक्षकारांना जलद न्याय मिळेल. ज्यामुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
👍 🙏 ❤️ 14

Comments