Sanjay Uttamrao Deshmukh
February 5, 2025 at 11:41 AM
*खासदार संजय देशमुख साहेब यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन वाशिम- पोहरादेवी- दिग्रस- माहूर- आदिलाबाद आणि वाशिम- कारंजा- बडनेरा या नव्या रेल्वे मार्गांसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणी केली. या रेल्वे मार्गामुळे संपूर्ण परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे.*
वाशिम ते अदिलाबाद हा नविन रेल्वे मार्ग झाल्यास पोहरादेवी आणि माहूर तीर्थक्षेत्राला मोठा फायदा होईल.
या रेल्वे मार्गामुळे पोहरादेवी आणि माहूर या प्रसिद्ध तीर्थस्थळी येणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः राज्यभरातून येणाऱ्या भक्तांसाठी अधिक सोयीस्कर प्रवासाची व्यवस्था निर्माण होईल. रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे या धार्मिक स्थळाच्या पर्यटनाला अधिक चालना मिळेल.
*वाशिम आणि दिग्रस होणार महत्त्वाची जंक्शनं*
या नवीन रेल्वे मार्गामुळे वाशिम आणि दिग्रस महत्त्वाची जंक्शनं म्हणून विकसित होतील. वाशिम ते आदिलाबाद मार्गामुळे दिग्रस येथे मोठे जंक्शन होणार असून, त्यामुळे विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमेवरील रेल्वे वाहतूक सुलभ होईल.
*आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना*
या नव्या रेल्वे मार्गांमुळे स्थानिक व्यापार, शेतीमालाची बाजारपेठ, तसेच उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळेल. वाशिम, दिग्रस, कारंजा, माहूर परिसरातील नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील.
👍
❤️
7