Dindoripranit Creation
February 4, 2025 at 10:58 AM
*🔱ओळख देवीच्या विविध स्तोत्राची🔱*
*१) रात्री सूक्त :*
🔅हया स्तोत्राचा पाठ रोज संध्याकाळी केल्यास,देवी प्रसन्न होऊन आपल्यातील तमोगुणाचा, आळस, नैराश्य दूर करते,व दुष्ट
शत्रूचा नाश होतो.
*२) देव्या कवच :-*
🔅सर्व देव कवचात श्रेष्ठ कवच आहे.देवी उपासकानी ह्या कवचाचा पाठ केला असता त्यांना देवी कवच एक अभेद्य कवच प्राप्त होते.त्यामुळे सर्व संकटाचे निराकरण होते.तसेच जे देवी उपासक श्री सप्तशतीचे पाठ करतात त्यांनी पाठापुर्वी दुर्गाकवच,अर्गला,किलक स्तोत्राचा पाठ करणे फार महत्त्वाचे असते.
*३)भगवती किलक स्तोत्र:-*
🔅या स्तोत्राच्या नित्य वाचनामुळे अपमृत्यू ढळतो आरोग्य,सौभाग्य, संपदा प्राप्त करून देणारे आहे.
🔅कृष्णाष्टमी, कृष्ण चतुर्दशीला सकाळ संध्याकाळ वाचन करावे.
*४)सिद्ध कुंजीका स्तोत्र :-*
🔅आई भगवती चे हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे.
🔅याचे रोज ९ वेळा वाचन केल्यास एका सप्तशती पाठाचे फळ मिळते.
*५)कनक धारा स्तोत्र:-*
🔅हे आद्यशंकराचार्यानी हे स्तोत्र लिहलेले आहे.हे स्तोत्र रोज सकाळसंध्याकाळ म्हटले असता धनलक्ष्मी प्राप्ती व सद् भाग्य प्राप्ती होते.
*६)देवी अथर्वशीर्ष :-*
🔅या अश्विन महिन्यातील नवरात्र उपासनेत हे स्तोत्र आवर्जून म्हटले जाते.
🔅हयाच्या शिवाय सप्तशतीचा
पाठ करणे फलदायी ठरत नाही.
मंगळवार,शुक्रवार,पौर्णिमा हया दिवशी हे अवश्य म्हणावे.
🔅 हया देव्यथर्वशीर्षाचे एक वार पठण केले तर पूर्वीच्या १२तासात जाणता अजाणता केलेल्या पापांचा नाश होतो.
🔅रोज दहा वेळा हे म्हटले तर संकटापासून सुटका होते.हे स्तोत्र जर १०८वेळा म्हटले तर त्याचे पुरश्चरण होते.
*७)त्रिपुर सुंदरी स्तोत्र:-*
🔅रोज संध्याकाळी देवापुढे तेलवात लावून शांत व प्रसन्न मनाने हे स्तोत्र म्हटले असता ऎहिक सुखाची व मनःशांती प्राप्ती होते.
*८)महालक्ष्मी कवच :-*
🔅हया अष्टकाचे रोज पठण केल्यास त्यामुळे पापमुक्ती होते.तसेच जर हे अष्टक रोज दोनवेळा म्हटले तर संपत्तीलाभ होतो.त्रिकाळ पठण केले तर महाशत्रूसुध्दा नाश होतो.
🙏
👍
❤️
😮
39