Dindoripranit Creation

14.6K subscribers

About Dindoripranit Creation

*Official Whatsapp Channel* *श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास मार्ग ( दिंडोरीप्रणित )* , *अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर जि. नाशिक* *Follow us on Instagram-* *dindoripranit_creation* *Gurupeeth_annadan__dattadham* *Shree_gurupeeth* *Mymauli111* *Shri_swamisamarth_dindori* *Swami_sparsh_dindoripranit_1109*

Similar Channels

Swipe to see more

Posts

Dindoripranit Creation
6/20/2025, 1:09:39 PM

*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️🙏* *💯🌹कुलदेवता माहित नसल्यास ती शोधण्याची सेवा🌹💯* *👉एक सुपारी घेऊन तिची कुलदेवता म्हणून हळद कुंकू, अक्षता वाहून रोज पूजा करावी.रात्री झोपताना ती सुपारी उशीखाली ठेवून झोपावे. झोपण्यापूर्वी कुलदेवतेला तिची खूण सांगण्याची विनंती करावी. व मगच झोपावे.11 मंगळवार एकादशी सारखे कडक उपवास करावेत.या काळात धर्म,संस्कृती प्रमाणे आचरण ठेवावे व्रतस्थ राहावे.निष्ठा पूर्वक हे व्रत केले तर कुलदेवी दृष्टांतात आपल्या क्षेत्रा च्या खुणा सांगते हे अनुभव सत्य आहे.*

🙏 ❤️ 👍 🥹 66
Dindoripranit Creation
6/20/2025, 1:09:11 PM

*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️🙏* *👉ज्याप्रमाणे भगवदगीतेत ९ व्या अध्यायात भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे जे लोक अनन्य भक्तीभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो.* *👉 त्याचप्रमाणे आपल्या II श्री स्वामी समर्थ II महाराजांनी आपल्या भक्ताला वचन दिलं आहे की जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो आणि मला शरण जातो त्याचं रक्षण मी करतो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या अभिवचनाची प्रचिती तेव्हाच येईल जेव्हा आपण II श्री स्वामी समर्थ II ह्या मंत्राचं अखंड नामस्मरण करू तेव्हाच.* *Like, share, follow* https://www.instagram.com/reel/DLG0xg4I7ul/?igsh=MW1iaWhjZTN4a2t0YQ==

🙏 ❤️ 👍 38
Dindoripranit Creation
6/19/2025, 2:13:32 PM
🙏 ❤️ 👍 👌 🙇‍♀️ 🙇‍♂ 99
Video
Dindoripranit Creation
5/25/2025, 6:39:00 AM

🚩 || *श्री स्वामी समर्थ* || 🚩 श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) 🌿 *पर्यावरण प्रकृती विभाग*🌳 अंतर्गत *वृक्षरोपण, संवर्धन, संशोधन व प्रबोधन* -------------------------------------------------- *प्रश्न:- वृक्षरोपांची लागवड केव्हा व कशी करावी ?* *उत्तर:-* पावसाळ्याचे पहिले दोन पाऊस पडून गेले, जमीन ओली झाली की रोपे लावण्यास योग्य काळ असतो. वर्षा ऋतूत साधारणत जून, जुलै, ऑगस्ट हा काळ विशेष महत्वाचा असतो. हिवाळा हा वनस्पतींचा विश्रांतीचा काळ असतो. काही वनस्पती (थंड प्रदेशातील) हिवाळ्यातच लागवड करतात. *वृक्षरोपण पद्धती*- प्रथम वृक्षरोपणाच्या काही दिवस अगोदर 2 X 2 X 2 आकाराचा खड्डा करून माती काढून घ्यावी. माती व सेंद्रिय/नैसर्गिक खत प्रमाण 2:1 असावे. तसेच वृक्षरोपण करतांना निंबोळी पेंड वापरावी. वृक्षाच्या मुळांना गाईच्या शेणाने लेपण करून वृक्षरोपण करावे. वृक्षरोपण नंतर भरपूर पाणी घालावे. ------------------------------------------------ *प्रश्न:- कोणत्या नक्षत्रावर वृक्षरोपण करावे ?* *उत्तर:-* रोहिणी, मृग, उत्तरा, हस्त, चित्रा, विशाखा, अनुराधा, मूळ, श्रवण, रेवती ही नक्षत्रे असतांना वृक्षरोपण करण्यास योग्य आहेत. ------------------------------------------------ *प्रश्न:- वृक्षांच्या वाढीसाठी धूप, सिंचन आणि लेप.* *उत्तर:-* लहान वृक्षांना गाईच्या तुपाचा धूप दाखवावा, जवस आणि दूध यांच्या मिश्रणाने रोपांना सिंचन करावे. वावडिंग आणि तीळ यांच्या पेंडीचा लेप रोपांना दिल्यास त्यांची वाढ खूप होते. ------------------------------------------------ *प्रश्न:- जास्त फुले व फळे मोठी होण्यासाठी काय करावे ?* *उत्तर:-* फुलांची संख्या वाढीसाठी 10 ग्रॅम-हिंग 50 ग्रॅम-दह्यात भिजवावे हे द्रावण 30 लिटर पाण्यात टाकून ढवळावे नंतर गाळून झाडांवर फवारावे *उपाय:-* मोठी फळे येण्यासाठी झाडाच्या खाली त्रिफळा चूर्णाचा धूर करावा तसेच वावडिंग, तीळ, Uगाईचे तूप समप्रमाणात घेऊन त्याच्याझाडाच्या खाली धूर करावा म्हणजे मोठी फळे मिळतात. ------------------------------------------------ *प्रश्न:- वृक्षरोपांची वाढ लवकर व्हावी, फुलझाडे उत्तम बहरावी यासाठी काय करावे ?* *उपाय:-* वृक्षरोपण करतांना मातीसोबत गाईचे शेणखत, गांडूळ किंवा कंपोस्ट खत हे प्रमाण 1:2 ठेवावे. वृक्षास जिवामृत, दशपर्णी, अमृतपाणी यांची फवारणी व पाण्यासोबत मुळांना द्यावे तसेच वरील सेंद्रिय किंवा नैसर्गिक खते 15 दिवसांनी घालावी. ------------------------------------------------ *प्रश्न:-* *कीटकांनी ग्रासलेल्या (खालेल्या), वृक्षाला फांद्या, अंकुर, आणि फुले वाढत नसतील, वाऱ्याने मोडलेल्या वृक्षांवर काय इलाज करावा* *उत्तर:-* वृक्षांची वाढ, विकास होत नसेल, वृक्षांचे दोष दूर करण्यासाठी गायीचे मूत्र, तूप, वावडिंग, मोहरी आणि तीळ यांचा लेप द्यावा किंवा वरील मिश्रण कुटून पाण्यात मिसळून सिंचन करावे. शक्य असल्यास वरील मिश्रणाची धुरी संध्याकाळी वृक्षास द्यावी. असे केल्यास वृक्ष वाढीस लागतो. ------------------------------------------------ *प्रश्न:- वृक्षरोपांवरील किडीला घालविण्यासाठी काय करावे ?* *उत्तर:-* *उपाय:- (1)* करंज, बहावा, रिठा, सप्तपर्णी, वेखंड, नागरमोथा, गोमूत्र, वावडिंग हे एकत्र करून मिश्रणाने झाडावर सिंचन करावे. *उपाय:- (2)* हिरवी मिरची व लसूण यांचे मिश्रण उकळून फवारल्यास कीटकनाशकाचे काम करते. ------------------------------------------------ *प्रश्न:- सुकत जाणाऱ्या वृक्षावर कोणता इलाज करावा ?* *उत्तर:-* वृक्ष सुकण्याचे कारण - 1. पाणी योग्य प्रमाणात न मिळाल्यास (कमी / जास्त झाल्यास) 2. उधई/वाळवी, कृमी-कीटकांना मुळ्या खाल्यामुळे. *उपाय:-* गरम केलेले तूप, वावडिंग, दूध आणि पाणी एकत्र करून 7 दिवस वृक्षांना सिंचन करावे. ------------------------------------------------ *प्रश्न :- काळा मावा, पांढरा मावा यावर घरगुती उपाय काय?* आलं (अद्रक) - २० ग्राम लसूण पाकळ्या - १० नग हिरवी तिखट मिरची - १० नग हे सर्व हलके कुटून घ्या एकत्र आणि साधारण ३ लिटर गरम पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे मिश्रण वस्त्रगाळ करून घ्या व उरलेले चोथा झाडांना टाका. या वस्त्रगाळ केलेल्या पाण्यात देशी गाईचे गोमूत्र ५० मिली टाका. हे द्रावण स्प्रे बॉटल मध्ये ३० मिली घ्या आणि बाकी पाणी मिसळून फवारणी करा. महिन्यातून दोन वेळेस तरी ही फवारणी करा. कारण दमट हवामानात पांढरा मावा लगेच झाडांना पकडतो. ------------------------------------------------ *अधिक माहितीसाठी संपर्क:-* पर्यावरण प्रकृती विभाग, श्री स्वामी समर्थ सेवा प्रधान केंद्र, दिंडोरी जि नाशिक *फोन* 02557-221710, *मोबाईल* 7755941721, 9860418186 *ई मेल आयडी :-* [email protected] *वेबसाईट :-* www.dindoripranit.org

🙏 👍 ❤️ 10
Dindoripranit Creation
5/25/2025, 6:40:07 AM

*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ ‼️🏵️🙏* *💯🌹सोमवती आमावस्या 🌹💯* *🌹आमावस्येची सेवा.अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा🌹* *👉 अमावस्या प्रारंभ सोमवार दुपारी १२:१२ वा.सुरु होत आहे.ती मंगळवारी सकाळी ०८:३२ वा.समाप्ती आहे.* *👉अमावस्येचे महत्व : - स्कंदपुराणाच्या प्रभास खंडानुसार* *"अमावस्यां नरो यत्सु परान्नमुपभुत्र्जते। तस्य मासकृतं पुण्क्मन्नदातु: प्रजायते"* *👉अर्थ : - अमावस्येला जी व्यक्ती दुसऱ्याचे घरचे अन्न खाते.त्याचे एक महिन्यात कमावलेले पुण्य दुस-यास,त्या अन्नदात्याला प्राप्त होते.* *संदर्भ : - (स्कंद पुराण - प्रभास खंड व श्री गुरुचरित्र* *👉अमावस्येला मृत पुर्वजासांठी "पितृ कर्म"तर्पण,हवन,पिंडदान,श्राद्ध,आगारी (घास टाकने),अन्नदान इ.कर्म करणे पुण्यकारक असते.* संदर्भ : - गरुड पुराण *👉 अमावस्येला झाडाचे फुले,पाने,फळे तोडने निषिद्ध आहे.ब्रम्ह हत्येचे पाप लागते.(विष्णू पुराण)* *🔸 अमावस्येला शेतीत कामे करू नये.मजुरां कडून देखील करून घेऊ नये.* *👉 या दिवशी घराचा उंबरठा गोमूत्रात हळद कालवून हळदीने सारवून घ्यावा.पाण्यात मीठ,हळद,गोमूत्र,लिंबू टाकून घर पुसून घ्यावे,सर्व यंत्र / वाहने,घर स्वच्छ करून,नारळ ७ वेळा उतारा करुन फेकून देणे.* *👉 अमावास्येला करावयाची विशेष सेवा* *👉एक भैरवचंडी पाठ घरी / केंद्रात करावा.* *👉 ९०० श्लोकी नवनाथ पारायण करावे. घरी / केंद्रात.* *👉 १) पंचगव्य संपूर्ण शरीराला (उटण्यासारखे) लाऊन गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी,जमल्यास नदी तीरावर अथवा तिर्थक्षेत्री पंचगव्य संपुर्ण अंगाला लावुन स्नान केल्यास अति उत्तम (पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लाऊ नये)...* *👉 २) घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी (पांढरी) मोहरी घेऊन ११ वेळा कालभैरवाष्टक व ११ वेळा वेदोक्त "वल्गा सुक्त" म्हणून घरात व बाहेर टाकल्याने घराचे वाईट शक्ती व इतर सर्व प्रकारच्या बाधेपासून संरक्षण होते. करणी बाधा कृत्यापासून संरक्षण होते.* *👉३) अमावास्येच्या दिवशी घराच्या आजुबाजुच्या सर्व सेंद्रिय देवी-देवतांचा (माऊल्या म्हसोबा मुंजा वगैरे) हार,नारळ, खडीसाखर यथा शक्ती दक्षिणा ठेवून मानसन्मान करावा* *👉 ४) अमावास्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा,घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशुळ काढून नारळ उतारा करावा.* *👉 ५)आपल्या घरातील,ऑफिसमधील,दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करुन व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ,हळद,लिंबू,गोमूत्र व पंचगव्य टाकून (केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासचे फ्लोअर क्लिनर / फिनेल पण चालेल) घर स्वच्छ पुसून घ्यावे.* *६) हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा.* *७) आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरुन नारळ उतारा हा सात वेळा "श्री स्वामी समर्थ" मंत्र म्हणून करावा (उतारा करतांना वाहन हे जागेवर चालू ठेवावे) व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासूक्त ११ वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेऊन पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी.* *८)घर,दुकान,ऑफिस,कारखाना,वाहन यांना असोला नारळ,गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे.* *👉 अमावास्येला आसोला नारळ,कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर खालील स्तोत्र मंत्र म्हणावेत.* *१) श्री स्वामी समर्थ १ माळ* *२) श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र १ माळ* *३) शाबरी मंत्र १ माळ* *४) नवनाथ मंत्र ११ वेळा* *५) कालभैरवाष्टक ११ वेळा* *६) वल्गासूक्त ११ वेळा.* *गोरक्षचिंच,आसोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे,जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडावे...* *👉आसोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो.किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे.त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा,आसोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा.* *हिरण्यदान:* *👉अमावास्येच्या स्वतः काही खाण्यापिण्या अगोदर शक्यतो १२ ते १२.३० वा.दरम्यान जानवे जोड,३०० ग्रँम पेढे,११ रु. अथवा यथाशक्ती दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान देणे.(प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये).ही वेळ पाळता येत नसेल तरी काही हरकत नाही.मात्र देण्यागोदर नाष्टा / जेवू नये.दक्षिणा आपल्या क्षमतेनुसार द्यावी.* *👉 घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे,शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ-संध्याकाळ त्यावर एका नंतर एकेक असे ७ कापूर जाळावे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. दर पौर्णिमा व अमावास्येला नारळ बदलून घ्यावा.जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा.(नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा)* *👉देव पूजे अगोदर नित्यसेवा ग्रंथातील पितृसूक्ताचे हवन करावे.पितरांचा फार मोठा आशीर्वाद मिळून सर्वत्र यश मिळते.तसेच पितृ स्तोत्र फक्त वाचावे.* *‼️ आधार जीवांचा प. पू.श्री गुरुमाऊली ‼️*

Post image
🙏 ❤️ 🎉 👌 👍 21
Image
Dindoripranit Creation
5/25/2025, 6:40:49 AM

*⚜️ मासिक मिटिंग | कृषीरत्न आदरणीय आबासाहेब मोरे* https://youtu.be/FNg5l1WxDdw?si=ZKdNa9dZ3cEiEczy

🙏 ❤️ 😂 🎂 🙇‍♀ 15
Dindoripranit Creation
5/25/2025, 10:03:13 AM

🚩II श्री स्वामी समर्थ II🚩 *🌍पर्यावरण व कृषीशास्त्र विभाग 🌍* ...............अंतर्गत.............. *(दि.२७ मे ते ०५ जुन पर्यंत)* 🌊 *गंगादशहरा निमित्त :नदी स्वच्छता अभियान*🌊 🔸परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशा नुसार, विपुल पर्जन्य वृष्टि साठी गंगा दशहरा उत्सव कालावधीत सर्व सेवा केंद्राद्वारे आपल्या शहरातील, गावातील, परिसरातील नदी, तलाव, जलाशय या ठिकाणी मान सन्मान करून विपुल पर्जन्यवृष्टी साठी प्रार्थना करने तसेच स्वच्छता अभियान चे नियोजन करून प्रबोधन करावे, त्यात सर्व भाविक, सेवेकरी, पर्यावरण सह १८ विभाग प्रतिनिधि यांना सहभागी करून घ्यावे.🙏🏻 🔸या अभियानात पर्जन्य सूक्त, स्थानिक देवतेंचा मान सम्मान, परिसर स्वच्छता, वरून पूजन आदी उपक्रम राबवावेत. ---------------------------- 🔸सदरील उपक्रमाचे फोटो व माहिती खालील क्रमांकवर पाठवावी. Phone : 7755941721, 7757008652

Post image
🙏 ❤️ 🌸 🇦🇼 👍 😢 22
Image
Dindoripranit Creation
5/24/2025, 1:18:30 PM

*श्री स्वामी समर्थ* *🛕श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्तधाम येथे* *🔥हवनयुक्त एकदिवसीय श्री गुरुचरित्र पारायण* *8 दिवस बाकी आहेत.....*

Post image
🙏 ❤️ 👍 🎉 😢 38
Image
Dindoripranit Creation
5/25/2025, 3:01:54 PM

*!! श्री स्वामी समर्थ !!* *अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक* 🌺 *मासिक सत्संग सोहळा*🌺 📑 *दिनांक. २४ मे २०२५* *श्री प्रसादालय येथे महाप्रसादाचा* *आस्वाद घेताना भाविक सेवेकरी* *अन्नदान सेवेची सुवर्ण संधी.* https://rzp.io/l/AnnadaanSeva 📲 अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी Instagram ला Follow/Subscribe करा: https://www.instagram.com/gurupeeth_annadaan__dattadham?igsh=MWFkcGo3MXlqam5weQ==

🙏 ❤️ 27
Video
Dindoripranit Creation
5/26/2025, 11:05:24 AM
🙏 ❤️ 25
Video
Link copied to clipboard!