Dilip Walse Patil
January 21, 2025 at 09:05 AM
आपल्या शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुकच्या ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतून जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी नवीन १८ वर्गखोल्या उभारण्याचा घेतलेला निर्णय आणि येत्या वर्षभरात हे काम करण्याचा केलेला निश्चय खरोखर कौतुकास्पद आहे.
गावातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने गावकरी बांधवांनी दाखवलेली ही एकजूट राज्यभरातील अन्य गावांसाठी देखील प्रेरणादायी आहे. हा विधायक संकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी जातेगावकरांना माझ्या खूप खूप शुभेच्छा!
👍
5