Dilip Walse Patil
6.4K subscribers
Verified ChannelAbout Dilip Walse Patil
Minister for Cooperation, Government of Maharashtra । Member of Maharashtra Legislative Assembly from Ambegaon, Pune। Senior leader NCP ।
Similar Channels
Swipe to see more
Posts
मा.जिल्हा परिषद सदस्य श्री.प्रमोदशेठ बबनराव कानडे यांचा ५० वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न…!!
आपल्या मतदारसंघातील आमोंडी- फलकेवाडी (त्रिवेणीवाडी) येथील श्री गणेश मंदिराच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ या भक्तिपूर्ण धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. या दिव्य प्रसंगी भगवान यज्ञनारायणाचे दर्शन घेऊन त्यांच्या पावन आशीर्वादाची अनुभूती घेतली. यज्ञमंडपातील अखंड हरिनाम संकीर्तन, ज्ञानयज्ञाचे पवित्र वातावरण आणि श्रद्धाळू भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे वातावरण पूर्णतः अध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेने भारलेले होते.तसेच येथील मा. सरपंच वै. भिकाजी शंकर फलके यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या ‘त्रिवेणीवाडी सभागृह’ व कै. अविनाश नथुजी फलके यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या ’त्रिवेणीवाडी प्रवेशद्वार’ या दोन्ही वास्तूंचा लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते पार पडला. या दोन्ही वास्तू ग्रामस्थांच्या विविध उपक्रमांना चालना देण्यास लोकोपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व आयोजक मंडळींचे मनःपूर्वक अभिनंदन. यावेळी विष्णू काका हिंगे, माजी सभापती प्रकाशराव घोलप, माजी सभापती संजय गवारी, मंचर बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, सरपंच आरतीताई कोतवाल, उपसरपंच धनंजय फलके यांच्यासह भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता दळणवळण झाले अधिक सुलभ! आपल्या मतदारसंघातील पोंदेवाडी ते संविदणे फाटा आणि पोंदेवाडी ते देवगाव या सिमेंट रस्त्यांचे काम मार्गी लागले असून, यासाठी आपल्या प्रयत्नांतून आणि आमदार निधीतून ८० लाख आणि ६५ लाख रुपये निधी अनुक्रमे मंजूर करण्यात आला आहे. पोंदेवाडी ते संविदणे फाटा आणि पोंदेवाडी ते देवगाव हा रस्ता दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून या रस्त्यांमुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या कामामुळे पंचक्रोशीत विकासाची नवीन वाट उघडली गेली असून हा रस्ता गावांच्या प्रगतीचा आधार ठरेल असा मला विश्वास आहे.

बागलमळा, मंचर येथे आदरणीय अशोक उर्फ बाळासाहेब जानकूशेठ बागल यांच्या साडेपाच महिन्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिलो. याप्रसंगी त्यांच्या स्मृतीस्थळी पुष्प अर्पण करताना त्यांच्या सामाजिक कार्याची, लोकसेवेची व दांडग्या जनसंपर्काच्या सहजपणाची आठवण झाली. त्यांच्या कुटुंबियांसह सर्व आप्तेष्टांप्रति या दुःखाच्या प्रसंगी सांत्वन व्यक्त करतो. बाळासाहेबांची मूल्याधिष्ठित वाटचाल आणि समाजप्रेम आम्हा सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील.
आमोंडी-फलकेवाडी येथे श्री गणेश मंदिर रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ उत्साहात संपन्न.