Dilip Walse Patil
January 23, 2025 at 01:11 PM
राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची (मांजरी बु.) ४८वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना सन २०२३-२४ गाळप हंगामातील कामगिरीबद्दल विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात आपल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देशाचे माजी कृषीमंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते मध्य विभागातील “सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार” प्रदान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्यासह सर्व संचालक व अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला.
कारखाना कार्यक्षेत्रात व परिसरात ऊस उत्पादन वाढीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, योजनांची अंमलबजावणी तसेच यासाठीची पुरेशी आर्थिक तरतूद या सर्व बाबींचा विचार करून या पुरस्कारासाठी आपल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची निवड करण्यात आली. या पुरस्काराने झालेला हा सन्मान आपल्यासाठी नक्कीच आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
👍
❤️
8