Dilip Walse Patil

6.4K subscribers

Verified Channel
Dilip Walse Patil
January 31, 2025 at 11:14 AM
आपल्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे श्री धर्मराज बीज यात्रा उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची आज ह.भ.प. धनंजय महाराज चव्हाण यांनी केलेल्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. याप्रसंगी उपस्थित राहून समस्त भाविक बंधू-भगिनींशी संवाद साधला. या सप्ताहाच्या निमित्ताने आमच्या निरगुडसर गावामध्ये गेल्या सुमारे अर्ध शतकाच्या कालावधीपासून जपल्या जाणाऱ्या या अध्यात्मिक परंपरेचा मला मनापासून अभिमान वाटतो. याप्रसंगी आयोजित महाप्रसादाचा देखील भक्तिभावाने लाभ घेतला.
❤️ 👍 4

Comments