Dilip Walse Patil
January 31, 2025 at 03:32 PM
आपल्या आंबेगाव तालुक्यातील जवळे गावची कन्या कु. अंकिता रमेश गावडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले असून महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारीपदी तिची निवड झाली आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल आज तिचा सत्कार करून अभिनंदन केले.
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अंकिताला एक लहान बहीण व भाऊ आहे आणि आई गृहिणी आहे. तिच्या वडिलांचे २०२१ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांच्या दूध विक्री व्यवसायाची जबाबदारी अंकिताची बहीण आणि कुटुंबाने आपल्या खांद्यावर घेतली. अंकिताने देखील अशा परिस्थितीत खचून न जाता जिद्द ठेवून शिक्षण सुरू ठेवले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून बायोटेक्नॉलॉजीची पदवी संपादन केली, तसेच पुढे एमपीएससीसारख्या अवघड परीक्षेचे शिवधनुष्यही लीलया पेलून दाखवले.
अंकिताने संघर्षांतून मिळवलेलं हे यश ग्रामीण भागातील मुलींसाठी नक्कीच प्रेररणादायी आहे. पुढील वाटचालीसाठी अंकिताला खूप खूप शुभेच्छा!
👍
❤️
🙏
6