Dilip Walse Patil

6.4K subscribers

Verified Channel
Dilip Walse Patil
February 1, 2025 at 09:01 AM
डी.जी. फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "भीमाशंकर करंडक" या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाची महाअंतिम फेरी आज संपन्न होत आहे. आपल्या परिसरातील युवकांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या सर्वात मोठ्या महोत्सवांपैकी एक असलेल्या या महोत्सवास सैराट फेम अभिनेते आकाश ठोसर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महाविद्यालयीन जीवनात अभ्यासासोबतच विविध कलागुणांच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. व्यक्तिमत्व घडवणाऱ्या अशा अनोख्या उपक्रमात आपणही सहभागी व्हावे व सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व या महोत्सवाचा उत्साह अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
🙏 2

Comments