Dilip Walse Patil
February 5, 2025 at 04:12 AM
आपल्या मतदारसंघातील करंदी (ता. शिरूर) येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि पुणे म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार मा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमवेत विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा वर्गखोल्या, काँक्रीटीकरण, रस्ता, बंदिस्त गटार, कचरा घंटा गाडी, अनुसूचित जाती व जमाती वस्तीतील शौचालय, नळ पाणीपुरवठा काम, शाळेसाठी पाणीपुरवठा, दशक्रिया घाट स्वच्छतागृह, महिला स्वच्छतागृह अशा विविध सुमारे ५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण याप्रसंगी पार पडले. तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सेवापूर्ती तथा निवडीबद्दल सत्कार देखील करण्यात आले.
या विकासकामांच्या माध्यमातून नक्कीच आपल्या करंदी परिसरातील विकासाला मोठी चालना मिळणार आहे. आगामी काळातही विकासासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत.
यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी, करंदी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🙏
1