Dilip Walse Patil
February 7, 2025 at 10:38 AM
आंबेगाव तालुक्यातील अमोंडी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील कु. शिवलाल राशीराम यादव या विद्यार्थ्याने तयार केलेल्या 'कचऱ्यापासून विद्युत निर्मिती' या उपकरणास जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात इयत्ता नववी ते बारावी आदिवासी गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, तसेच त्याच्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड देखील झाली आहे. या यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! त्याला मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे आणि प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचेही मनापासून कौतुक आहे.
विशेष म्हणजे लालबहादूर शास्त्री विद्यालयाने देखील या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यंदाच्या वर्षी सलग चौथ्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे. यशातील या सातत्याबद्दल विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षकवृंद व व्यवस्थापनाचे विशेष अभिनंदन!
आपल्या आदिवासी भागातील विद्यार्थी म्हणजे प्रतिभेचा मोठा ठेवा आहेत, हीच बाब या विद्यालयाने सिद्ध केली आहे. आगामी काळातही त्यांनी असेच यश मिळवत रहावे, यासाठी खूप खूप शुभेच्छा!
👍
1