Dilip Walse Patil
February 8, 2025 at 10:58 AM
आंबेगाव तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, कृषी क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१० पासून "आंबेगाव महोत्सव" आयोजित करण्यात येतो.
यंदाही मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर कृषी उत्पन्न बाजार समिती, अनुसया महिला उन्नती केंद्र, आडत व्यापारी असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य आंबेगाव महोत्सव संपन्न होत आहे. ७ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती !
🙏
❤️
4