Aditi Varda Sunil Tatkare

18.1K subscribers

Verified Channel
Aditi Varda Sunil Tatkare
February 3, 2025 at 07:56 AM
मौजे वेळास (गवळीवाडी) येथे श्री हनुमान मंदिर सभागृह उद्घाटन! माझ्या स्थानिक आमदार निधी कार्यक्रमांतर्गत, मौजे वेळास (गवळीवाडी), ता. श्रीवर्धन येथे श्री हनुमान मंदिर सभागृह बांधकामाच्या उद्घाटनाचा मला लाभ मिळाला. या नवीन सभागृहामुळे स्थानिक ग्रामस्थांना सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांसाठी योग्य सुविधा उपलब्ध होतील. या कार्यक्रमाला विभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. ग्रामविकास आणि जनसुविधांचा विकास हा माझा नेहमीच प्राथमिक हेतू राहिला आहे. भविष्यातही अशाच प्रकारच्या लोकहिताच्या उपक्रमांसाठी सतत कार्यरत राहीन.
❤️ 👍 👌 👏 😭 🙏 16

Comments