Aditi Varda Sunil Tatkare
18.1K subscribers
Verified ChannelAbout Aditi Varda Sunil Tatkare
Official WhatsApp channel of Women and Child Development Minister, Maharashtra and MLA Shrivardhan Assembly
Similar Channels
Swipe to see more
Posts
काल खोपोली, रायगड येथे RBL बँकेच्या “उमेद” या CSR उपक्रमांतर्गत २०० सायकल आणि शालेय साहित्य संच वाटप समारंभात सहभागी झाले. महिला व बालविकास मंत्री म्हणून माझा ठाम विश्वास आहे की, शिक्षण ही प्रत्येक मुलीची शक्ती आणि स्वप्नांची पायरी असते. या सायकली केवळ प्रवासाचे साधन नाहीत, तर त्या त्यांच्या स्वप्नांना नवे पंख देणाऱ्या आशेच्या सायकली आहेत. या मुलींनी नव्या जोमाने शाळेत जाऊन उज्ज्वल भविष्य घडवावे, हीच माझी सदिच्छा. RBL बँकेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार. यावेळी RBL बँकेच्या वरिष्ठ अधिकारी CSR व्यवस्थापक श्रीमती रेखा बोरले, नवीन अर्थव्यवस्था व भांडवली बाजार विभागाचे श्री रोहित अग्रवाल, महाराष्ट्र/गोवा सरकारी बँकिंग प्रमुख श्री मिलिंद विचारे, तसेच प्रादेशिक विपणन व्यवस्थापक श्री अजित सूर्यराव आदी मान्यवर उपस्थित होते. 📍https://x.com/iAditiTatkare/status/1927033889639248104?t=t1Fbi0BEHAjTRqU0fM9APA&s=19

आज मंत्रालयातील दालनात राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत बैठक घेतली. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता त्यांच्या एकत्रित कामावर आधारित होता, परंतु आता अंगणवाडी केंद्रांकरिता निकष निश्चित करण्यात येतील. बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि पूर्वशालेय शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येईल. अंगणवाडी केंद्रांचे गुणवत्तापूर्ण मूल्यमापन करून त्यानुसारच प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. याच बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती दिनी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराचे” वितरण करण्याचा निर्णयही झाला. या बैठकीस राज्यमंत्री श्रीमती मेघनाताई बोर्डीकर (दूरदृश्यप्रणालीद्वारे), महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, सह सचिव वी. रा. ठाकूर, उपायुक्त श्रीमती संगीता लोंढे, उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव प्रसाद कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते. 📍https://x.com/iAditiTatkare/status/1927732252613742604?t=-jp31Z_ojMV9Il7ti8F5yw&s=19
