Aditi Varda Sunil Tatkare
February 3, 2025 at 06:16 PM
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या प्रलंबित विषयांबाबत बैठक!
आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बाल हक्क संरक्षण, कल्याणकारी योजना आणि उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सखोल चर्चा करण्यात आली.
बालकांच्या हक्क व संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या आयोगामधील रिक्त पदे भरण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. तसेच, दरवर्षी बालमहोत्सवाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्राशी निगडित असलेल्या बालकांसाठी विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे ही निर्देश दिले.
बालकांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी आयोगाचे कार्य अधिक प्रभावी होणे आवश्यक आहे. शासन स्तरावर सर्वसमावेशक धोरणे, तातडीच्या उपाययोजना आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी मी वचनबद्ध आहे.बालकल्याण हा आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे आणि प्रत्येक बालकाचे संरक्षण, शिक्षण आणि समृद्ध भविष्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
या बैठकीस राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष मा. सुशीबेन शहा, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री. कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
#childrights #बालहक्क #wcdmaharashtra #childwelfare
❤️
👍
🙏
3