Aditi Varda Sunil Tatkare
February 3, 2025 at 06:26 PM
माविम, उमेद या संस्थांच्या कामकाजाबाबत, तसेच विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालय दालनात बैठक घेतली.
📌 महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुका स्तरावर अस्मिता भवन उभारणीच्या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या.बाजारपेठ असलेल्या तालुक्यांमध्ये हे भवन उभारले जाणार असुन ज्यामुळे “माविम”च्या महिला बचतगटांना व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे.
📌 महिलांना स्वावलंबी करण्यासाठी उत्तम काम करणाऱ्या उमेद व माविम या संस्थांच्या समन्वय व सुसूत्रीकरणाबाबत चर्चा केली.
📌 महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नियोजित असलेल्या कार्यक्रमाबाबत चर्चा केली.
📌 रोहा येथील गारमेंट प्रकल्प व श्रीवर्धन येथील सोलर फिश ड्राइंग प्रोजेक्टच्या कामाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
महिला व बालविकास विभागांतर्गत सर्व संस्थांच्या योग्य समन्वयासाठी, सर्व प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहे.
यावेळी माविमच्या कार्यकारी संचालक श्रीमती वर्षा लढ्ढा यांच्यासह माविम व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
👍
❤️
💩
6