Aditi Varda Sunil Tatkare

18.1K subscribers

Verified Channel
Aditi Varda Sunil Tatkare
February 7, 2025 at 05:26 PM
आदि “ती” महोत्सव – सुधागड-पालीत महिलांसाठी आनंदाचा उत्सव! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा. खासदार श्री. सुनिलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच मा. ना. कु. अदितीताई तटकरे आणि मा. आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महिलांच्या उत्स्फूर्त सहभागात सुधागड-पाली तालुक्यात “आदि ‘ती’ महोत्सव” भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला! या खास सोहळ्यात हळदी-कुंकू समारंभ, मराठी लोकगीतांचा ऑर्केस्ट्रा, नृत्याविष्कार, लकी ड्रॉ, पैठणी बक्षिसे आणि महिलांसाठी विशेष भेटवस्तू अशा अनोख्या आकर्षणांनी उपस्थित महिलांचा आनंद द्विगुणित केला. महोत्सवाचे विशेष आकर्षण प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर यांच्यासोबत महिलांनी मनमुराद गाण्यांच्या तालावर ठेका धरत जल्लोष साजरा केला. या उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद लुटणाऱ्या सर्व महिलांचे मनःपूर्वक आभार!
👍 ❤️ 10

Comments