Aditi Varda Sunil Tatkare

18.1K subscribers

Verified Channel
Aditi Varda Sunil Tatkare
February 8, 2025 at 03:52 AM
माणदेशी महोत्सव २०२५ ! माणदेशी फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील महिला बचत गटांना व खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, आपल्या ग्रामीण संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे या उद्देशाने नरे पार्क, करी रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या माणदेश महोत्सवाचा माझ्या हस्ते शुभारंभ केला. ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी करण्यात आलेला प्रयत्न अत्यंत अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे. या महोत्सवाचा एक भाग होण्याची संधी मला मिळाली याबद्दल माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा, प्रभात सिन्हा व दिव्य सिन्हा यांचे आभार व्यक्त केले व माणदेशी महोत्सवाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई साहेब, ज्येष्ठ पत्रकार श्री.प्रताप आजबे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई कार्याध्यक्ष व मुंबई बॅंक उपाध्यक्ष श्री.सिद्धार्थ कांबळे, सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त श्री. सुदर्शन सांगळे, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी इंदू जाखड, पोलीस उपायुक्त श्री.मोहित गर्ग, अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडू श्रीमती अपर्णा पोपट, जिल्हाध्यक्ष श्री.महेंद्र पानसरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
👍 ❤️ 😂 😮 15

Comments