Aditi Varda Sunil Tatkare

18.1K subscribers

Verified Channel
Aditi Varda Sunil Tatkare
February 8, 2025 at 03:47 PM
अनेकांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या, आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी (ISC) संस्थेच्या आंतरभारती बालग्रामच्या माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनात लोणावळा येथे उपस्थित सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांसोबत, गुरुजनांसोबत संवाद साधला. या संस्थेचा पाया रचून स्व.डॉ. झुली नाखुदा यांनी गरजू, अनाथ व वंचित मुलांसाठी शिक्षणाचे व्यासपीठ निर्माण केले. या संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी समाजासाठी, देशासाठी बहुमोल योगदान देत आहेत हे खरोखर अभिमानास्पद बाब आहे. या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचे बलस्तंभ म्हणून उभे राहावे असे आवाहन केले व संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आ.श्री. सुनीलआण्णा शेळके, बालग्रामचे अध्यक्ष श्री. शैलेश दालमिया, संचालक श्री. संतोष शिंदे, श्री. फरहान नाखुदा, बालविकास उपायुक्त श्री. राहुल मोरे, बालहक्क आयोगाच्या सदस्य सौ. जयश्री पालवे, श्रीमती मनिषा बिराजदार, कार्यकारी संचालक श्रीमती मेधा ओक, श्री. उदय शहा, श्री. ॲबरीन मेमन, साजीदा मस्केटी यांच्यासह अनेक आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.
👍 ❤️ 💐 10

Comments