Aditi Varda Sunil Tatkare
February 9, 2025 at 04:10 AM
रोटरी क्लब ऑफ इंडियाच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या AUREYA 2025 या 17व्या वार्षिक रोटरॅक्ट कॉन्फरन्स निमित्ताने चर्चासत्रात सहभागी होत "महिलांच्या व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचे धोरण" या विषयावर मत मांडले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, पिंक ई रिक्षा योजना, महिला आर्थिक विकास महामंडळ अशा विविध माध्यमातून महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी सरकार काम करत आहे. तसेच, बालकांच्या शारीरिक व मानसिक संगोपनासाठी, पोषणासाठीही सरकार कृतिशील आहे. या प्रयत्नांना निश्चित यश मिळेल व पुढील काळात महाराष्ट्र महिलांच्या व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण जगासमोर एक "रोल मॉडेल" ठरेल हा विश्वास यावेळी व्यक्त केला.
तसेच, समाजाच्या जडणघडणीत रोटरी क्लबच्या बहुमोल योगदानाप्रती सर्वांचे आभार व्यक्त केले. AUREYA 2025 च्या यशासाठी, तसेच रोटरी क्लबच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
👍
❤️
🙂
11