Aditi Varda Sunil Tatkare

18.1K subscribers

Verified Channel
Aditi Varda Sunil Tatkare
February 10, 2025 at 10:03 AM
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या प्रौढ गट पुरुष व महिला जिल्हा निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने वाशी, ता. पेण येथे आयोजित प्रौढ गट पुरुष व महिला जिल्हा निवड चाचणी आणि अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन करण्याचा सन्मान मला लाभला. वैकुंठ दादा पाटील मित्रमंडळ जय भवानी वाशी आणि वरसुआई वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील कबड्डीपटूंना आपली कौशल्ये सिध्द करण्याची उत्तम संधी मिळाली. याप्रसंगी आ. रविशेठ पाटील, श्री. आस्वाद पाटील (सरकार्यवाह, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन), श्री. वैकुंठ पाटील, सौ. चित्रा पाटील, श्री. जे.जे. पाटील आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ असून, या क्रीडासंस्कृतीला अधिक चालना देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
👍 ❤️ 🙏 5

Comments