Aditi Varda Sunil Tatkare
February 10, 2025 at 01:15 PM
महिला सशक्तीकरणाचा उत्सव... आदिती महोत्सव !
माणगाव शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा.खा. सुनिल तटकरे साहेब, मा.आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाने महिला सशक्तिकरणाचा भव्य उत्सव म्हणून "आदिती महोत्सव" आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासह महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले, यावेळी अनेक महिलांनी आपला कलाविष्कार सादर केला. विशेष म्हणजे या अदिती महोत्सवाच्या निमित्ताने तालुक्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री उपक्रमही राबवण्यात आला. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे यांचीही उपस्थिती लाभली.
👍
🙏
❤️
9