Ravindra Phatak

8.3K subscribers

Verified Channel
Ravindra Phatak
January 23, 2025 at 11:08 AM
प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा, हा विचार रूजवत महाराष्ट्रीय माणसाचा हुंकार ठरलेले हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आनंद आश्रम येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. जनमानसावर पकड असलेले राजकारणी, अमोघ वक्तृत्वासोबतच भेदक लेखन आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांचे काम ही आमच्यासाठी खूप मोठी शिकवण आहे. यावेळी, खासदार श्री. नरेश म्हस्के, मंत्री श्री. प्रताप सरनाईक, ठाणे शहर जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षीताई शिंदे व इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments