मराठा आरक्षण कुणबी प्रवर्गातूनच
मराठा आरक्षण कुणबी प्रवर्गातूनच
January 29, 2025 at 01:58 PM
अत्यंत महत्वाची व तातडीची सूचना.....! जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ केज येथे गुरुवारी रास्तारोको ! मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची व सहकाऱ्यांची प्रकृती खालावत चालली आहे. चिंता वाढली आहे. जरांगे पाटील यांनी सकळ मराठा समाजासाठी आपला जीव धोक्यात टाकला आहे. समाज हीच त्यांच्या आंदोलनाची ताकद आहे. त्यांच्या प्राणाची चिंता करणे व त्यांना सुरक्षित ठेवणे समाजाची जबाबदारी आहे. बीड जिल्ह्यात आता मराठा समाजाने तात्काळ रत्यावर उतरून शासनाला उपोषणाची दखल घ्यायला लावावी लागेल.यासाठी केज तालुका व परिसरातील सकल मराठा व बहुजन समाज बांधवांच्या वतीने गुरुवार दि 30 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता केज येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी केज तालुका व परिसरातील सकळ मराठा व बहुजन समाज बांधव, युवक व युवतींनी मोठया संख्येने या रास्तारोको आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सकळ मराठा बहुजन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. (कृपया कमी वेळात आंदोलन घोषित केल्यामुळे याबाबतचा मेसेज सर्वांपर्यंत पोहोंच करण्यासाठी सहकार्य करा. जवळच्या लोकांपर्यंत मेसेज नक्की पाठवा. आपण या व इतरांनाही सोबत आणा.) *फाॅलो करा :----👇* https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12
👍 🙏 ❤️ 😂 😢 61

Comments