आरंभ - सुरवातीचे क्षण मोलाचे
January 29, 2025 at 11:31 AM
*खेळघरात खेळुया....* https://youtube.com/shorts/TUwWDyXc-dI बालके आई-बाबा, आजी-आजोबा यांच्या कृतीचे उत्सुकतेने निरीक्षण करुन त्यांची नक्कल करतात. उदा. काम करणे, बोलणे, चालणे, तयारी करणे. खेळघरात मोठ्यांच्या कृतिची नक्कल करुन बालके आनंदित होते. *बौद्धिक पार्श्वभूमी –* मोठ्यांच्या कृतीचे निरीक्षण केल्याने बालकांची निरीक्षण क्षमता वाढते. मोठ्यांनी केलेल्या कृती आठवून त्याची नक्कल केल्याने बालकांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. आवडीच्या व्यक्तीच्या भूमिका केल्याने बालक आनंदित होऊन त्यांचा भावनिक विकास होण्यास मदत होते. खेळात इतर बालकांना सामावून घेतल्याने सामाजिक विकास होते. *धन्यवाद !* 😊🙏 _*आरंभ - सुरुवातीचे क्षण मोलाचे*_
👍 👌 😂 😮 7

Comments