आरंभ - सुरवातीचे क्षण मोलाचे

2.4K subscribers

About आरंभ - सुरवातीचे क्षण मोलाचे

बालसंगोपनासाठी सोशल मीडिया आमचं ध्येय 0-३ वर्षांच्या बालकाच्या संगोपनासाठी कुटुंब आणि समुदायाला सक्षम करणे. #earlymomentsmatter

Similar Channels

Swipe to see more

Posts

आरंभ - सुरवातीचे क्षण मोलाचे
2/20/2025, 9:37:27 AM

https://youtube.com/shorts/lQDqTfjd3E0 _*कृती : ठश्यांची जादू*_ घरामध्ये उपलब्ध असलेल्या उदा. कुंकू, नीळ, गुलाल, हळद, शेंदूर इत्यादी विविध रंगांच्या मदतीने पालकांनी बाळासोबत बाळाच्या तसेच पालकांच्या बोटांचे, हातांचे वेगवेगळ्या पानाफुलांचे ठसे उमटवावे व त्यापासून एखादी चित्रकृती तयार करावी आणि त्या सर्व कृती करताना त्याविषयी बाळाशी बोलावे. _*बौद्धिक पार्श्वभूमी :*_ कृती करताना बाळाच्या बोटांचा, हातांचा तसेच डोळ्यांचा वापर होतो त्यामुळे बाळाच्या बोटांच्या स्नायूंचा तसेच दृष्टीचा विकास होतो. बाळाला वेगवेगळे रंग, आकार समजतात. तयार झालेल्या ठश्यांपासून चित्र तयार केल्यामुळे कल्पना शक्ती वाढते. कलेविषयी आवड निर्माण होण्यास मदत होते. एका जागेवर बसून कृती करण्यामुळे एकाग्रता वाढीस लागते. _*धन्यवाद !*_ 😊🙏 _*आरंभ - सुरुवातीचे क्षण मोलाचे*_

👍 😮 6
आरंभ - सुरवातीचे क्षण मोलाचे
2/27/2025, 7:49:28 AM

विकासाचे टप्पे - १८ व्या महिन्यांपर्यंत ! | Developmental Milestones - upto 18 months https://youtu.be/ORSk570ezIc विकासाचे टप्पे - १८ व्या महिन्यांपर्यंत ! वाढ आणि विकास ही एक सातत्याने होणारी महत्वाची प्रक्रिया आहे. विशिष्ट वयोगटामध्ये बाळाने विशिष्ट गोष्टी करणे अपेक्षित असते यालाच “विकासाचे टप्पे” असे म्हणतात. या विडिओ मध्ये आपण १८ महिने म्हणजेच दीड वर्षापर्यंत (१ १/२) वयाच्या, बालकांच्या विकासाचे टप्पे बघणार आहोत. “१८ महिने” या वयापर्यंत असणारे बहुतांश बालक काय करतात ? १. उभे राहून काही पावले स्वतंत्रपणे चालतात. २. टाटा करणे, टाळ्या वाजविणे यासारख्या विविध परिचित क्रिया करतात. ३. छोटे खडे/ छोट्या वस्तु डब्यात टाकतात. ४. पुस्तकातील वस्तु आणि त्यांची चित्र पाहून ते ओळखतात आणि त्यांचे नावे सांगतात. त्यामुळे १८ महीने पर्यंत वयातील तुमचे बाळ या गोष्टी करू शकते की नाही याचे अवश्य निरीक्षण करा. आणि १८ महिने पूर्ण होऊनसुद्धा जर बाळाला … * आधाराशिवाय स्वत:हून उभे राहू न शकणे. * छोट्या वस्तु डब्यामध्ये टाकता न येणे. * ‘बाळा तुझं खेळणं कुठे आहे...दाखव बरं !’ असे म्हटल्यावर वस्तुकडे बोट न दाखवणे. * ‘आई, बाबा, दादा’ यासारखे साधे शब्द बोलता न येणे. * मातेने केलेल्या हातवाऱ्यांना प्रतिसाद न देणे आणि बालक स्वत:च्याच जगात मग्न असणे. * दैनंदिन कार्यासाठी दोन्ही हातांचा वापर न करणे. (म्हणजे एकाच हाताचा वापर करण्यास प्राधान्य देणे.) यापैकी कोणतीही बाब आढळून आल्यास ते “धोक्याचे संकेत” आहे हे समजून त्वरित जवळील आशा ताई, अंगणवाडी ताई, आरोग्य कर्मचारी किंवा तज्ञ आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. धन्यवाद ! आरंभ - सुरुवातीचे क्षण मोलाचे

👍 🙏 4
आरंभ - सुरवातीचे क्षण मोलाचे
2/17/2025, 8:04:31 AM
👍 🙏 5
आरंभ - सुरवातीचे क्षण मोलाचे
2/14/2025, 5:35:42 AM
👍 3
आरंभ - सुरवातीचे क्षण मोलाचे
2/13/2025, 4:28:53 AM

*कृती: चाकाची मज्जा* https://youtube.com/shorts/UB_46cO-wBs चाक कसे फिरते? ते असेच का फिरते? त्याचा उपयोग काय आहे? ते कसे काम करते? या सर्व गोष्टी जाणून घेण्याची बालकामध्ये खूप जास्त उत्सुकता असते तसेच बालकांना वेगवेगळ्या कृती करून त्यातील मज्जा अनुभवणे खूप आवडते. त्याच उत्सुकतेपोटी बालक त्या गोष्टी करून बघण्याचा प्रयत्न करते अशावेळी पालकांनी बालकाच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेऊन तशा कृती करण्यास प्रोत्साहन द्यावे आणि वेगवेगळे कुतूहल बघण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. *बौद्धिक पार्श्वभूमी :* अशा प्रकारची कृती पालकांनी बालकासोबत केल्यामुळे चाक कसे फिरते? याचे बालक निरीक्षण करते त्यामुळे निरीक्षण क्षमता विकसीत होते. बोटांचा वापर करून चाक फिरवल्यामुळे बोटांच्या स्नायूंचा विकास होतो. आपल्याला सुद्धा चाक फिरवता येते याचा बालकाला आनंद होतो आणि वारंवार ती कृती करताना मज्जा वाटते. *धन्यवाद ! 😊🙏* _*आरंभ - सुरुवातीचे क्षण मोलाचे*_

👍 ❤️ 5
आरंभ - सुरवातीचे क्षण मोलाचे
1/29/2025, 11:31:31 AM

*खेळघरात खेळुया....* https://youtube.com/shorts/TUwWDyXc-dI बालके आई-बाबा, आजी-आजोबा यांच्या कृतीचे उत्सुकतेने निरीक्षण करुन त्यांची नक्कल करतात. उदा. काम करणे, बोलणे, चालणे, तयारी करणे. खेळघरात मोठ्यांच्या कृतिची नक्कल करुन बालके आनंदित होते. *बौद्धिक पार्श्वभूमी –* मोठ्यांच्या कृतीचे निरीक्षण केल्याने बालकांची निरीक्षण क्षमता वाढते. मोठ्यांनी केलेल्या कृती आठवून त्याची नक्कल केल्याने बालकांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. आवडीच्या व्यक्तीच्या भूमिका केल्याने बालक आनंदित होऊन त्यांचा भावनिक विकास होण्यास मदत होते. खेळात इतर बालकांना सामावून घेतल्याने सामाजिक विकास होते. *धन्यवाद !* 😊🙏 _*आरंभ - सुरुवातीचे क्षण मोलाचे*_

👍 👌 😂 😮 7
आरंभ - सुरवातीचे क्षण मोलाचे
1/25/2025, 5:38:56 AM
👍 🙏 ❤️ 10
आरंभ - सुरवातीचे क्षण मोलाचे
1/21/2025, 7:36:33 AM
👍 🙏 6
Link copied to clipboard!