मी ज्ञानी होणार
February 12, 2025 at 03:41 PM
*इंटिग्रेट क्लासेसच्या IIT/ AIIMS फाउंडेशन बॅचच्या विद्यार्थ्यांची जेईई मेन्स च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात अभूतपूर्व यश.......*💐💐💐
आजच डिक्लेअर झालेल्या जेईई मेन्स या परीक्षेच्या निकालात
इंटिग्रेट क्लासेसच्या पहिल्या ऑफलाइन फाउंडेशन बॅचचे विद्यार्थी
1) अरशद पिरजादे (9वी पासून ऑफलाईन फाउंडेशन बॅच) - 97.5% आणि
2) कार्तिक चौधरी (9 वी पासून ऑफलाइन फाउंडेशन बॅच)- 97.4% या विद्यार्थ्यांनी जानेवारी 2025 मध्ये झालेल्या JEE mains या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात मूल्य यश मिळवून मे 2025 महिन्यात होणाऱ्या JEE advance या परीक्षेसाठी क्वालिफाय केले आहे. वरील दोन्ही विद्यार्थी मागील चार वर्षापासून इंटिग्रेट क्लासच्या IIT / AIIMS फाउंडेशन बॅचचे विद्यार्थी असून सदर विद्यार्थी इंटिग्रेट क्लासेसच्या मार्गदर्शनाखाली JEE ( Mains+advance) या परीक्षेची तयारी करत होते. सरांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच प्रयत्नात दोन्ही विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी क्वालिफाय केले आहे. दरवर्षी जे मेन्स परीक्षा सुमारे पंधरा लाख विद्यार्थी देतात व त्यामधून अडीच लाख विद्यार्थी ऍडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र ठरतात. तसेच या दोन्ही विद्यार्थ्यांना NIT इन्स्टिट्यूट मध्ये इंजीनियरिंग साठी ऍडमिशन मिळेल यातही कोणती शंका नाही.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल क्लासचे संचालक, प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आणि पुढील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अरशद व कार्तिक या विद्यार्थ्यांच्या यशामुळे इंटिग्रेट क्लासेस च्या फाउंडेशन बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून आता जेईई क्रॅक करण्यासाठी कोट्याला जाण्याची गरज नाही तर लातूर शहरातच इंटिग्रेट क्लासेसच्या IIT/ AIIMS फाउंडेशन बॅचला जॉईन करून तुम्ही या परीक्षेमध्ये यश मिळवू शकता.