शालेय शिक्षण
February 11, 2025 at 01:13 AM
*प्रेरणादायी गोष्ट थॉमस अल्वा एडिसन यांच्या लहानपणीची* 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 थॉमस अल्वा एडिसन नावाचा एक लहानसा मुलगा होता. तो अत्यंत जिज्ञासू होता. त्याला प्रत्येक गोष्टीचे "का?" हे उत्तर हवे असायचे. त्याच्या मनात नेहमी नवनवीन प्रश्न गर्दी करत असायचे – "आकाश का निळं आहे?", "झाडं का वाढतात?", "आवाज कसा होतो?" एडिसन शाळेत गेला, पण तिथे त्याला फारसे आवडत नव्हते,मन रमत नव्हते, शिक्षकांना वाटायचे की तो खूपच वेडा प्रश्न विचारतो आणि गोंधळ घालतो. एक दिवस शिक्षकांनी त्याच्या आईला एक बंद लिफाफा दिला आणि सांगितले, "हे पत्र घरी जाऊन वाचा." एडिसन घरी आला आणि त्याने आईला तो लिफाफा दिला. आईने ते पत्र वाचले, तिच्या डोळ्यांत पाणी आले. एडिसनने विचारले, "आई, त्या पत्रात काय आहे?" आईने हसून सांगितले, "या पत्रात लिहिलंय की, 'तुमचा मुलगा एक विलक्षण बुद्धिमान मुलगा आहे. या शाळेत त्याला शिकवणं आमच्यासाठी कठीण आहे. कृपया तुम्हीच त्याला घरी शिकवा.'" एडिसन खुश झाला. आईने त्याला घरीच शिकवले. आईने त्याच्या प्रश्नांना कधीच कंटाळून उत्तर दिले नाही. तिने त्याला अनुभवातून शिकायला शिकवले. वर्षानंतर, जेव्हा एडिसन खूप मोठा वैज्ञानिक झाला, तेव्हा त्याला तेच जुने पत्र सापडले. त्याने ते उघडून वाचले. त्या पत्रात खरं काय लिहिलं होतं माहिती आहे का? *"तुमचा मुलगा मंद बुद्धीचा आहे. तो इतर मुलांसोबत शिकू शकत नाही, म्हणून त्याला शाळेतून काढून टाकले आहे."* हे वाचून एडिसनचे डोळे पाणावले. त्याने ते पत्र हातात धरत लिहिले: "एक मंद बुद्धीचा मुलगा, ज्याला त्याच्या आईने विश्वास आणि प्रेमाने जगातील महान संशोधक बनवलं." *या गोष्टीतून आपण काय शिकतो?* *👉स्वतःवर विश्वास ठेवावा.* *👉कधीही हार मानू नये.* *👉आई-वडिलांचा प्रेम आणि पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो.* *👉वेगळं विचार करणं म्हणजे वेडं नसतं, तेच तर मोठ्या शोधांचं मूळ असतं!* थॉमस अल्वा एडिसनने नंतर इलेक्ट्रिक बल्ब, फोनोंग्राफ, आणि अनेक शोध लावून जग बदललं. कारण त्याच्यावर त्याच्या आईचा विश्वास होता!

Comments