भिडे गुरुजी सांगली 🚩
January 22, 2025 at 11:52 AM
श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
यांच्या मार्फत दरवर्षी निघणारी गडकोट मोहीम
यावर्षी
७ फेब्रुवारी २०२५ ते ११ फेब्रुवारी २०२५
श्री. उमरठे ते श्री.रायगड मार्गे श्री.मुरारबाजी देशपांडे समाधी
ही मोहीम श्री. भिडे गुरुजींनी जाहीर केली.
या मार्गावर डोंगरावर पोफळ्याचा मुरा हे गाव येते. या गावात ८ कुटुंब राहत आहेत. या गावाला पाण्यासाठी विहीर बांधून तयार होती. परंतु पाणी ग्रामस्थांच्या घरात आले नव्हते.
कारण सरकारी काम काही वर्ष थांब अशी अवस्था.
परंतु धारकरी त्या वाटेवरून जाणार. धारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न समोर उभा राहणार. हे लक्षात येताच शासन कामाला लागले आणि
ताबडतोब या गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला..
आणि गावामध्ये काल पाणी देखील आले...
मोहिमेच्या माध्यमातून गावाची नळ पाणी योजना चालू झाली.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांनी देखील काल संबंधित गावाला भेट दिली. त्या गावाचा कायमचा वीज प्रश्न मार्गी लागावा म्हणून एक डीपी आणि बारा पोल टाकण्याचा आश्वासन दिले.
ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे आभार*🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
❤️
👍
🧡
🕉️
🧠
74