लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान
February 17, 2025 at 05:55 PM
*#लैंगिक_आरोग्य -भाग 1*
आपण अजुनही लैंगिक समस्येवर किंवा त्या विषयावर बिचकतच बोलत असतो.लोक एकवेळ वात्रट मीम किंवा जोक करतील पण मुळात #सेक्स या विषयावर गंभीर चर्चा मात्र करत नाहीत.चर्चा करून आपली समस्या मांडल्याशिवाय ती समस्या सुटत नाही.
#पुरुषभान_संवाद_मंच , #अंधश्रद्धा_निर्मूलन_समिती आणि अनेक संस्था यविषयावर चर्चासत्र आयोजित करत असतात.
याविषयावर गैरसमज जास्त आहेत.तरीही लोक सेक्सोलॉजिस्ट कडे न जाता ऑनलाईन विदेशी वेबसाईटचा रस्ता धरतात जी की शुद्ध फसवणुक असते.
एरवी चर्चा करताना लोक “आम्हाला कसलीच समस्या नाही” “आम्ही त्यात माहिर आहोत.”, “आम्हीच लोकांना शिकवु शकतो .” अशी विधानं करतील.पण सत्य हे आहे की कित्येक स्त्रियांना लैंगिक तृप्ती मिळत नाही .त्याचे कारण स्त्री /पुरूषांचे याबाबत अज्ञान.
आपण कित्येक ठिकाणी नवरा-बायको,प्रियकर-प्रेयसी यांच्यामधील सतत होणाऱ्या भांडणाचा अभ्यास केला तर त्याच्या मुळाशी लैंगिक अतृप्ती असते.पण स्पष्ट बोलून दाखवले जात नाही.फोरप्ले,आफ्टरप्ले चा आभाव,शारीरिक अस्वच्छता हे पण तुमच्या निकोप लैंगिक संबंधामध्ये बाधा आणते.
एक जोडपं नेहमी एका कारणावरुन भांडायचं की, बायको नेहमी शारीरिक संबंध झाले की अंघोळ करायची मग ते दुपारी होवोत अथवा रात्री दीड वाजता.ते अपवित्र आहे हे बायकोच्या डोक्यात एवढे फिट बसले होते की किती नवऱ्याने समजवून सांगितले तरी ती लक्षात घेत नसे त्यामुळे तिच्या अश्या वागण्याने नवरा वैतागुन गेला कारण सगळ्यांना माहित व्हायचे घरात .शेवटी ते मतभेद एवढे विकोपाला गेले की त्याने बाहेर लफडी करायला सुरुवात केली.
लैंगिक समस्या ही नेहमी मानसिकतेशी संबंधित असते.तुमचे शारीरिक,मानसिक आरोग्य चांगले असेल तर तुम्हाला कसलेही औषध घ्यायची गरज नसते. #शक्ती_वाढवा ही औषध निव्वळ फसवणूक असते.इतरांची ऐकलेली अतिरंजित वर्णने आणि अतिरंजित पॉर्न विडिओ ज्यासाठी कित्येकवेळा थांबत शूटिंग घेतलेली असते. कित्येक अशास्त्रीय ,अघोरी गोष्टी फक्त पैशासाठी शूट केलेल्या असतात ज्यात पॉर्न स्टारला खुपदा कायमची दुखपत होत असते.पण बघणारे बरेच लोकं ते खरं समजून बसतात.त्याच्या आहारी जातात .
काही अपघात किंवा शारीरिक व्यंग असेल तरच समस्या निर्माण होतात व औषधोपचार घ्यायची गरज पडेल अन्यथा औषध घ्यायची गरजच नसते.
कित्येकदा स्त्री आपल्याला लैंगिक अतृप्ती मिळते हे बोलून दाखवत नाही तो राग इतर ठिकाणी काढते आणि समजा एखादी स्त्री बोलून दाखवत असेल तर ती अतिशहाणी समजली जाते.पुरुष आपल्याकडे स्त्रीला खुलवण्याचे कौशल्य नाही हे मान्य करत नाहीत. स्वतःशी मान्य केले तर सुधारणा करता येते. सेक्सओलॉजिस्ट यात मदत करू शकतात. काही पुरुषांना मानसिक दडपण येत असते यासाठी काउन्सलिंग करून घेता येईल. हे मान्य करणे म्हणजे मर्दानगी कमी असणे नव्हे.हा एक मोठा गैरसमज असतो.पण सत्य हे आहे की कित्येक म्हणजे जवळ जवळ 70 ते 80 % स्त्रिया लैंगिक दृष्टया अतृप्त आहेत.हे मी नाही सर्वेक्षण सांगते .
मुलं झाली म्हणजे आपण लैंगिक क्रिडे मध्ये पारंगत झालो असे नसते. फक्त मुल होण्यासाठी नाही तर आनंदी वैवाहिक जीवनासाठी सेक्स गरजेचे आहे.
बऱ्याच स्त्रियांना असे वाटत असते की मी जोड़ीदाराला लैंगिक सुख देते. तिला पण ते हवे असते आणि ती पण सुख घेत असते हे तिच्या डोक्यातच येत नाही. मी सुख देते आणि जोडीदार घेतो असेच तिला वाटत असते.या भावने पोटी आपले काही हट्ट पुर्ण करून घेण्यासाठी पुरुषांची लैंगिक अडवणुक हे हत्यारासारखं वापरते.
आपल्या लैंगिक इच्छा आणि तृप्ती कशात आहे यासंबंधी जोड़ीदाराशी स्त्री ने बोलले पाहिजे .तो स्त्रीचा हक्क आहे.
पुरुषांनी पण फक्त औषधे न घेता सेक्सओलॉजिस्टचे सल्ला मार्गदर्शन पण घेतले पाहिजे.
विठ्ठल प्रभु यांचे “निरामय कामजीवन" वात्सायनचे “कामसुत्र” अतिशय उपयुक्त आहे.
सगळ्यात महत्वाचं मानवी गरज आणि मानवाधिकार म्हणून लैंगिक ज्ञान हवे . सामाजिक सुव्यवस्था म्हणून लग्न बंधन हवे असेल तर लैंगिक कामपूर्ती ही जबाबदारी घ्यावी अन्यथा विवाह बाह्य संबंध मान्य करावे.
©️ #प्राजक्ता_पाटील
https://whatsapp.com/channel/0029VaAlVfn7j6gFqGrpl72t
👍
👌
✅
❤️
14