लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान

5.2K subscribers

Similar Channels

Swipe to see more

Posts

लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान
2/20/2025, 4:11:05 AM

*#लैंगिक_आरोग्य -भाग 2* *#लैंगिक_शिक्षण* https://whatsapp.com/channel/0029VaAlVfn7j6gFqGrpl72t लैंगिक शिक्षण किती गरजेचे आहे हे कुटुंब कलह,अनेक वैवाहिक समस्या,लैंगिक शोषण हे पहिल्यानंतर कळते. माझ्या नात्यात एक जोडपे आहे.मुलगा स्मार्ट,हुशार,वेलसेटल्ड आणि मुलगी सुंदर ,खानदानी (लोकांच्या मते ),सुसंस्कारी(म्हणजे कधीच एकटी न फिरणारी,का व कसे असे प्रश्न न विचारणारी,भूमिका योग्य असली तरी वडीलधाऱ्यांना विरोध न करणारी ,घरातील कामात सतत मग्नआणि ख़ाली मान घालून शाळा ,कॉलेज करणारी)तर त्यांचे लग्न झाल्यानंतर मस्त उटी, म्हैसुर,बेंगलोरला हनिमूनला गेले .पण मुलगी मख्ख ,कसलाच रिस्पॉन्स देत नव्हती .की खळखळून हसणे नाही की मोकळे वागणे बोलणे नाही.मुलगा वैतागुन गेला. घरी परत आल्यानंतर ती आदर्श सुन घरातील सगळे काम करायची,सगळ्यांचा आदर सन्मान,बेडरूम मध्ये गेली की मख्ख . सिनेमा बघताना गप्प गप्प तरी किंवा झोपुन जाईल.कॉमेंट्स करणे,विनोद करणे किंवा त्याला प्रतिसाद देणे नाही.शेवटी मुलगा म्हणाला मला घटस्फोट हवा.लोकांना कळेना एवढी सुंदर ,सुशिल पत्नी आणि याला काय झाले.बरं त्या मुलीला आपली नेमकी काय चुक झाली हे ही समजत नव्हते.ती फक्त रडायची. चुक दोघांची पण नाही.जरी आजकाल मुली बदलल्या असल्या तरी ते प्रमाण खुप कमी आहे आणि आता 40 शी ओलांडलेल्या महिलांची स्थिती तर त्यावेळी याहून वेगळी नव्हती(काही अपवाद) ना मुलींना कधी मुलांत मिसळू दिले जाते,न कधी हिंडण्या फिरण्यासाठी सैल सोडले जाते.तिला समजावून सांगून ,योग्य लैंगिक शिक्षण देण्याऐवजी बंधन घातले जाते.सिनेमात जरा बोल्ड दृश्य असतील तर टी व्ही बंद केला जातो.मोबाईल वर एखादा किसिंग सीन जरी मुलगी बघत असेल तर घरात स्फोट होतो.तिची आज्जी,आई,मावशी कोणीही विवाहोत्तर लैंगिक जीवनावर चर्चा करत नाहीत.“चट समजत होतं ,आम्हाला काय कोणी सांगायला होतं का ?” ही भूमिका असते त्यांची. जर याविषयावर बोलेचच नाही तर माहिती कोठुन मिळणार.लैंगिक आनंद घ्यायचा म्हणजे काय करायचे.समागम करताना रिस्पॉन्स द्यायचे म्हणजे नेमके काय करायचे ? हे तिला कसे आणि कोठुन समजणार आणि समागम करताना आनंद मिळत असेल तरी पहिल्या पासुन ती गोष्ट घाणेरडी आहे हे बिंबवल्यामुळे ती बोलून पण दाखवु शकत नाही. ओट्यावर बसुन एकमेकींना चावट टोमणे मारणे म्हणजे लैंगिक शिक्षण नव्हे. त्यामानाने मुलांची स्थिती चांगली आहे.त्यांना मित्रांमधुन,कसली तरी स्टॅंड वरची पुस्तकं वाचुन किंवा कधीतरी पॉर्न पाहून माहिती मिळते.पण ती योग्य दिशा नव्हे.पण त्यामुळे त्याच्या लैंगिक जीवनाच्या अपेक्षा पत्नी/गर्लफ्रेंड कडून जास्त वाढतात.ती मात्र अजुन त्यापासून लांबच असते.तिला तिथंपर्यन्त रुंजी घालवत आणावे लागते हा खरं तर निसर्ग नियम पण आहे.पण आपल्या याबाबत असलेल्या चुकीच्या रूढ़ी परंपरा .त्यामुळे याबाबत त्यांना आधी मानसिक दृष्टया तयार करणे गरजेचे आहे.तर तुमचा सेक्स चांगला होईल. लैंगिक शिक्षण हे निकोप लैंगिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी खुप गरजेचे आहे.तुमचे लैंगिक जीवन निकोप असेल तर तुमचे मानसिक स्वास्थ्य पण चांगले रहाते.तुमच्या जोडीदारा मध्ये आणि तुमच्यामध्ये दृढ़ नाते निर्माण होते.त्यामुळे जीवनात येणाऱ्या अडचणीना पण तोंड देणे सोपे जाते. सेक्स मध्ये इंटरेस्ट घेतल्यामुळे तुमचे आरोग्य पण चांगले रहाते.सेक्सची इच्छा आहे पण करताना अडचणी आहेत.जोडीदाराची साथ नसते नकार असतो, स्त्रीला ऑर्गेझम मिळत नाही अशावेळी कंबर,डोके दुःखी,अंग दुःखी,कामात उत्साह न वाटणे,चिंता वाटणे,असुरक्षित वाटणे इ. समस्या निर्माण होतात. आपल्या जोडीदाराला समजून घ्या.लैंगिक जीवनाचा आनंद घ्या.एकमेकांना योग्य भाषेत ,एकमेकांचा अपमान न करता गरजा सांगा. खुपदा ग्रामीण भागात तरी नवरा ,बायको मध्ये एकजण चाळीशी ओलांडली की सेक्स लाइफ बद्दल उदासीन होतो .मुलं मोठी झालेत .आता सुना ,जावई यायचं वय झालं अन अजुन आपलच सुरु ठेवणं योग्य नाही असं वाटतं. पण जोडप्यानी ठरवले तर खुप काळ पर्यन्त ते लैंगिक जीवनाचा अस्वाद घेवू शकतात. सगळ्यात महत्वाचं मानवी गरज आणि मानवाधिकार म्हणून लैंगिक ज्ञान हवे . सामाजिक सुव्यवस्था म्हणून लग्न बंधन हवे असेल तर लैंगिक कामपूर्ती ही जबाबदारी घ्यावी अन्यथा विवाह बाह्य संबंध मान्य करावे. ©️ #प्राजक्ता_पाटील

Post image
👍 ❤️ 👌 🎉 😢 🙏 37
Image
लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान
2/21/2025, 11:42:19 AM

*#लैंगिक_आरोग्य भाग-3* https://whatsapp.com/channel/0029VaAlVfn7j6gFqGrpl72t #फोरप्ले काही दिवसांपूर्वी एका फेसबुक फ्रेंडची एक कॉमिक पोस्ट होती .ती म्हणते Good morning darling आणि त्यावर तो म्हणतो पटकन चहा टाक. Exactly हेच होतं . तिचे इशारे, नखरे,नकळत स्पर्श करणे,मुरके घेणे,मुद्दाम वेगळ्या हालचाली याच्या गावी पण नसतात. स्त्रीला हव्या असणाऱ्या गोष्टी खुप छोट्या आणि सोप्या पण असतात. प्रचंड महागडे गिफ्ट आणि शॉपिंग,हॉटेलिंग हेच तिला खुश ठेवते हा एक गैरसमज. खुप पुरुषांना असे वाटते की सेक्स च्या आधी केलेली मिठ्या,किस आणि दाबादाबी म्हणजेच फोर प्ले ,पण फोर प्ले त्याच्या खुप आधीपासुन सुरु होणारी गोष्ट आहे. त्याची सुरुवात शरीरापासून नाही तर मनापासून झाली पाहिजे.मी काही उदाहरण देते. 1. माझ्या एका मित्राने सांगितले बायको आणि तो गाडीवर जात असताना अचानक त्याने गाडी थांबवली बाभळीच्या झाडाखाली आणि गप्पा मारत मारत त्या बाभळीच्या शेंगा तिच्या पायात पैंजणा प्रमाणे बांधल्या,त्याचा छान खुळ खुळ आवाज आला. 2. आम्ही मित्र मैत्रिणी बाहेर जेवायला गेलो होतो .मी घास घेणार तेवढ्यात माझा मित्र म्हणाला थांब ,अगदी जशी आहेस तशी . मी थांबले पण नेमके काय झाले ते विचारले कारण त्याला फोटो पण नव्हता काढायचा.त्याला पहायचे होते माझे हेलकावे घेणारे कानातले मंत्रमुग्ध होऊन . मागे एकदा एका मित्राकडे गेले होते .त्याचे पुस्तक प्रकाशन होते म्हणून . रात्रभर प्रवास करून सकाळी पोहोचले .त्याच्या घरात प्रवेश केला आणि जागीच थबकले .त्याची बायको नुकतीच न्हाऊन आलेली असावी केस टॉवेल मध्ये बांधले होते .मंद सुगंध येत होता . किचन ओट्यावर पाठमोरी काहीतरी काम करत होती .एवढी आकर्षक वाटत होती .अशी स्त्री/बायको /प्रेयसी बघून मागून मिठी मारण्याचा मोह झाला नाही तर त्याच्या सारखा अरसिक तोच. न्हाउन आलेल्या बायकोच्या केसांचा वास घ्या, ती स्वयंपाक करत असताना तिच्या हालचाली पहा,ती मस्त ड्रेसिंग टेबल जवळ तयार होत असताना तिच्या हालचाली डोळ्यांत साठवा, अचानक तिच्या केसात फूल किंवा गजरा माळा,रोज एक तरी घास स्वतःच्या हाताने भरवा . नास्तिक असलात तरी तिच्या सोबत हाताला हात लावून पुजेला जवळ बसा.शालू मधील तिचा गंध अनुभवा (नक्की काय आठवते पहा) .असा छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद तिला द्या आणि मग प्रणया मधला तिचा भरभरुन मिळालेला प्रतिसाद अनुभवा. आपला नवरा/बॉयफ्रेंड अंघोळी वरुन येवून भांग पाडत असताना .हळूच जावून मागून मिठी मारू हलकासा किस घेवुन या. जेवताना किंवा काही मिठाई वगैरे खाताना त्याला हळूच एक घास भरवा.घरातल्यांची नजर चुकवून हलकासा चिमटा घ्या.मंद म्यूजिक लावून,कधी फुलांचा वापर करून वातावरण निर्मिती करा. कित्येक वेळा स्त्रिया अगदी लहान सहान गोष्टींवरून चिडचिड करत असतात .घरातील कुरबुरी बेडटाईम मध्ये डिस्कस करायची सवय पार्टनरचा मुड घालवणारी आहे . पुढाकार स्त्रियांनी पण घ्यायला हवा कित्येकदा घरात कमावती व्यक्ती पुरुष असते किंवा दोघे कमावते असले तरी खूप क्वचित ठिकाणी दोघे कारभार करतात . अन्यथा हा भर पुरुषांवर असतो .त्यामुळे तो तणावात असेल तर तुमची लडिवाळ छेडछाड त्याचा ताण हलका करतो . मी हे फक्त उदाहरण दिलेत .तुम्ही तुमची कल्पकता वापरा.इंटरकोर्स मनासारखा धुंद हवा असेल तर फोरप्ले स्किप करू नका. त्यातल्या त्यात स्त्रीची तयारी तिचं मन प्रफुल्लित करण्यापासुन करायची असते.नाहीतर तो सेक्स तिच्या मनापर्यन्त पोहोचत नाही आणि ती सतत अतृप्ती अनुभवते. एक प्रकारचा दुरावा तिचा जोडीदारा सोबत निर्माण होतो.जो ना तिला कुठे शेअर करता येतो न तुम्हाला.अन्यथा एका उशी सोबत किंवा बाहुलीसोबत सेक्स केल्यासारखे तुम्हाला वाटेल. ©️ #प्राजक्ता_पाटील

Post image
👍 ❤️ 👌 🙏 🍬 😘 47
Image
लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान
2/23/2025, 9:33:28 AM

*#लैंगिक_आरोग्य भाग-4* *#Personal_Hygiene_and_Sexual_life* *(वैयक्तिक स्वच्छता आणि लैंगिक जीवन)* https://whatsapp.com/channel/0029VaAlVfn7j6gFqGrpl72t इंग्रजीत टायटल दिलं की कसं भारी वाटतं. “पहाटे पहाटे मला जाग आली...” सुंदर गाणं. विशालने जेंव्हा नीलमला पहाटे जवळ घेतले. तोंडाचा भपकारा आला आणि रोमॅंटिक मुड पार निघुन गेला. मीरा आणि मितेश हे नवविवाहित जोडपे हनिमूनला गेले. खुप आनंदात असलेली मीरा मात्र तिथे हिरमुसली . मितेशच्या अंगाला एक उग्र दर्प येत होता. ज्यामुळे तिला त्याच्या जवळ ही जाऊ वाटत नव्हते आणि त्याला स्पष्टपणे सांगता ही येत नव्हते. सोनल घरकामात एकदम चटपटीत ,बोलण्यातही तशीच पण या कामात तिचं स्वतःकडे लक्ष नसायचं . तो घट्ट आणि दिवसभर घामाने भिजलेला ब्लाउजच बेडरूम मध्ये पण असायचा हळू हळू तिचा नवरा सुजित सेक्स टाळू लागला. मितालीला स्वच्छता न बाळगल्यामुळे योनीमार्गात नेहमी फंगलइन्फेक्शन व्हायचे त्यामुळे तिच्या पार्टनरला व्हायचे आणि मग दोघांना ही खाज सुटून त्यांचे सेक्स लाइफ डिस्टर्ब व्हायचे. रितेश बरोबर नेहा डेटवर गेली खरं पण त्या दोघांना ही तिथे त्रास झाला रितेशला स्वच्छतेची व्यवस्थित शिकवण लहानपणा पासुन नव्हती त्यामुळे त्याच्या शिश्न मुंडावर बारीक खडे तयार झाले होते आणि त्याचा उग्र वास येत होता. शिवाय त्याला सेक्स करताना दुःखत होतं. वरील उदाहरणांमधुन लक्षात येईल तुम्ही फक्त रोमॅंटिक आणि सेक्स मधील माहितीगार असणे एवढेच महत्वाचे नाही तर वैयक्तिक स्वच्छता पण महत्वाची. #काय_दक्षता_घ्याल 1.दिवसभर वापरलेले कपडे बेडरूम मध्ये वापरु नका. साधाच पण वेगळा पोशाख ठेवा. 2. शक्यतो संध्याकाळी पण अंघोळ करा.कित्येकदा दिवसभर अंगमेहनतीचे काम किंवा प्रवासातील दगदग यामुळे घाम आणि अंगाला वास येत असतो. 3. बेड वर जाण्यापुर्वी ब्रश करा. 4. इनर गारमेंट्स संध्याकाळी बदलत जा , जेणेकरून इन्फेक्शन होणार नाही. 5. आपल्या अंगाला दुर्गंधी येत असेल तर कारण शोधुन उपाय करा. 6. सिगारेट,तंबाखू,गुटखा याचा वास पार्टनरला सहन होइलच असे नाही. 7. सुगंधी वस्तु पण योग्य प्रमाणात वापरा. अति उग्र होतात 8.सगळ्यात महत्वाचे तुमच्या जननेंद्रियांची स्वच्छता. 9.वेळचेवेळी हेअर रीमुव्ह करावेत . एरवी तर स्वच्छता असावीच पण इंटरकोर्स पुर्वी स्वच्छ करून घ्यावे. #परिणाम 1.स्वच्छते अभावी तुम्हाला तर इंफेक्शन होइलच पण पार्टनरला पण होण्याची शक्यता असते. त्यातल्या त्यात तरूण असताना हे सहन होईल वाढत्या वयात शरीर थोड़े कमकुवत झालेले असते किंवा मधुमेह किंवा इतर अजार असतील तर फार पटकन इंफेक्शन होते. 2.स्वच्छते अभावी गजकर्ण सारखे पण अजार जननेन्द्रिया जवळ होतात. 3. स्वच्छता नसेल तर पर्टनरला किळस वाटेल,त्यातही ओरल करायची कित्येकांची इच्छा असते. तुमची अस्वच्छता आणि वरुन जबरदस्ती तर पार्टनर तुमचा तिरस्कार करेल आणि साधा इंटरकोर्स पण घडून येणार नाही. 4.कित्येक प्रकारचे कॅन्सर स्त्रियांना जननेन्द्रियाच्या स्वच्छतेचा आभाव आणि किरकोळ आजार उदा.योनीमार्गातून येणारा दुर्गंधीयुक्त पांढरा स्त्राव .यांच्या कडे दुर्लक्ष केल्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर,तर स्तनाचा कॅन्सर दुधाच्या योग्य वेळी निचरा न झाल्यामुळे.पण साधी स्तनांची मालिश करणे किंवा हात लावून पहाणे हे आज ही कित्येक स्त्रियांना लाजिरवाणे वाटते. वैयक्तिक स्वच्छता योग्य प्रकारे कशी ठेवावी हे खरे तर लहान वयापासूनच शिकवायला हवे. आपण उटणे लावून अभ्यंग स्नान , केस धुणे आठवड्यातून 2/3 तरी करायला हवे .उटणे आणि तेल यांचे मिश्रण.डाळीचे पीठ , हळद,दूध , चंदन पावडर यांचे मिश्रण .हे नैसर्गिक स्क्रबर आहेत .त्यामुळे ....... 1.उटण्यामुळे त्वचा स्वच्छ आणि सुगंधित होते आणि तेला मुळे मुलायम . 2.कांती उजळते आणि शरीरावरील डाग कमी होतात . 3.चेहरा प्रसन्न आणि उजळ दिसतो. 4.शरीराला मंद सुगंध येतो . हे अगदी सहज करण्यासारखे उपाय आहेत . वैयक्तिक स्वच्छता ठेवा, निरोगी रहा, जीवनाचा आनंद घ्या. ©️ #प्राजक्ता_पाटील

👍 ❤️ 👌 35
लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान
2/24/2025, 1:09:52 PM

*#लैंगिक_आरोग्य भाग -5* *#प्रायव्हसी* https://whatsapp.com/channel/0029VaAlVfn7j6gFqGrpl72t मुळात आपल्या इकडे मुल व्हायची किती घाई . दोन वर्ष तरी वेळ द्यावा एकमेकांना आणि मुलगी 18 /19 वर्षाची असेल तर पाच वर्ष .जुनी खोडं तशीच ओरडू द्यावी .त्यांना नातवंडांचे तोंड बघायची खूप घाई . मुलं व्हायच्या आधीची प्रायव्हसी मुलं झाल्यावर रहात नाही मग काय करावे ? माझी बहिण कॉलेजला शिकत असताना तिने मला एक किस्सा सांगितला होता .तिच्या मैत्रिणीचे आईवडील त्यांच्या प्रत्येक मॅरेज ऍनिव्हार्सरीला सकाळी सहा वाजता घरातून निघून जातात आणि थेट रात्री 10 /11 ला घरी येतात .त्यांच्या दोन मुली घरीच असतात आणि आई बाबा कुठे गेले हे त्यांना माहीत नसते .त्या दिवशी त्या बहिणी घर सांभाळतात. ही सवय त्यांना लहापणापासूनच लावली गेली. माझ्या एका नात्यातील मावशीकडे मी लहान असताना गेले होते .शहरात घर लहान आणि घरात माणसं भरपूर. स्वतः ची मुलं ,नणंद आणि जावेची मुलं शिकायला घरी आणि सासू . संध्याकाळी सगळे मिळून जेवायचे पण सकाळी दोघे नवराबायको मिळून स्वयंपाक करायचे. सगळ्यांना बसवून जेवू घालायचे आणि नंतर सगळे उठून आपापल्या कामाला लागायचे आणि मग हे दोघे एकत्र गप्पा मारत जेवायचे . माझ्या स्वतःच्या घरात मी ,माझा मुलगा , मुलगी आणि नवरा नेहमी येता जाता एकमेकांना मिठ्या मारतो. त्याची आता एवढी सवय झाली की आम्ही वेगळं काही करतो असं आम्हाला वाटत नाही आणि पाहणाऱ्यांना ते सवयीचं झालं . एकदा सर्वेक्षण करायला एक शिक्षक आमच्याकडे आले होते .“मॅडम मी 3 दिवसांपूर्वी आलो होतो पण तुम्ही दोघं महाबळेश्वर ला गेला होता ." आणि त्यानंतर सासू आणि दोन छोटी मुलं घरी ठेवून तुम्ही दोघच कसं जाऊ शकता म्हणून अर्थ तास डोकं खाल्लं .“सासू अष्टविनायक यात्रेला जाऊन आली ,मुलं पण सहलीला जाऊन आली. आता आम्ही गेलो .त्यात काय?" पण ते काय त्या बिचाऱ्याला पचनी पडले नाही लेकरं घरी ठेवून बाई जावूच कशी शकते ? नवरा बायकोने सोबत जेवणे ,घास भरवणे,गप्पा मारत चहा घेणे ,एकमेकांना टाळी देणे ,पाठीवर थाप मारणे ,गालांना स्पर्श करणे,अगदी नजरेने एकमेकांना पहाणे यात पण मजा आहे ,एकमेकांचे डोके ,पाय चेपून देणे हे चोरून लपून नाही नाही मुलांच्या समोर झाले पाहिजे.या क्रिया सहज घडल्या पाहिजे .एकमेकांबद्दल प्रेम आपुलकी व्यक्त करतात हे स्पर्श ते करताना अपराधी भावना मनात बाळगण्याचे काही कारण नाही . या उलट मुलं तुम्हाला अगदी एकमेकांच्या जवळ बसलेले पण बघणार नाहीत आणि रात्री अचानक इंटरकोर्स करताना मुलं जागी होतात .तेंव्हा त्यांना काय वाटत असेल ? लहानपणी अचानक पाहिलेली ती गोष्ट त्यांच्या मनावर विचित्र पद्धतीने कोरली जाते . त्यापेक्षा स्पर्शातून सहजता त्यांना ही शिकवा . प्रायव्हसी ही डायरेक्ट इंटरकोर्स करताना लागते फोर प्ले किंवा आफ्टर प्ले साठी नसली तरी चालते. पूर्वी मानव कोठून या सगळ्या गोष्टी शिकत असेल.शिकू द्या मुलांना प्रेमळ स्पर्श ,काळजी घेणं म्हणजे या गोष्टींची त्यांना किळस , अनादर, हिडीस न वाटता आल्हाददायक वाटतील. ज्या गोष्टी पाहिल्या किंवा मिळाल्या नाहीत त्या ओरबाडून घेतो माणूस किंवा बाहेर शोधतो . खरे विचित्र काय आहे हे आपण ओळखायला शिकले पाहिजे. बहुतांश स्त्रियांचा अनुभव 25 ते 40 वर्षाची स्त्री गुंतलेली संसारात ,मुलांमध्ये , घरकामात आणि त्याच वेळी त्या वयाचे पुरुष कामात असतातच पण स्वतःला एकटे समजतात ,जास्त वेळ मित्रांसोबत घालवतात ,बायको सोबत प्रायव्हसी नाही म्हणून काही जण व्यवसायात पुर्णतः अडकवून घेतील स्वतःला ,वेश्यागामन करतील ,काही जण बाहेर अफेअर्स करतील ,काहीजण व्यसनी बनतील .पण नवरा बायको मिळून चर्चेतून तोडगा काढणार नाहीत . #काही_उपाय 1.घरात वडीलधारी मंडळी असेल तर मुलांना त्यांच्या जवळ झोपायची सवय लावा . 2.5/6 वर्षानंतर बेडरूम उपलब्ध असेल तर बेडरूम किंवा नसेल तर वेगळा बेड देवून मुलांना स्वतंत्र एकटे झोपायला शिकवा . 3.6 व्या वर्षानंतर घरात मुलांना काही सूचना देवून ,नातेवाईक ,किंवा अन्य काही व्यवस्था करून अधून मधून सुट्टीचा दिवस दोघेच घालवा . 4.मॅरेज अनिव्हार्सरी किंवा काही स्पेशल डे दोघे मिळून साजरे जरा .मुलांची व्यवस्था करा .त्यात कसलाही अपराधी भाव बाळगू नका . 5.नेहमी लक्षात ठेवा आपले आई वडील एकमेकांवर प्रेम करतात ,एकमेकांसोबत आनंदी रहातात हे मुलांना आवडत असतं .नकळत आपण त्यांना ते शिकवत असतो.. 6. मी सासू सासऱ्यांची मदत घेणारच नाही आणि त्यांचे टोमणे पण ऐकून घेणार नाही असले दुराभिमान बाळगू नका .माणूस परस्परावलंबी असतो . 7.आपल्याला मिळणाऱ्या अनमोल क्षणासाठी वडील धारी जुन्या विचारांची मंडळी टोमणे मारत असले तरी सहन करा ,दुर्लक्षित करा . दीड दमडीच्या टोमण्यांच्या नादी लागून किंवा इरीटेट होऊन अनमोल क्षण गमावू नका . 8.नातेवाईकांचे लग्न किंवा समारंभ अटेंड करायला जोडीने जा . जाता येता कुठेतरी थांबुन एकमेकांसोबत वेळ घालवा . 9.हनिमून फक्त एकदाच नसतो .सेकंड हनिमून वर आवश्य जा . 10.बायकोला डिनर डेटला न्या किंवा नवऱ्याला डिनर डेटवर नेवून सरप्राईज. 11.अचानक नवऱ्याच्या/बायकोच्या ऑफिसला भेट देवून कॉफिला न्या . 12.शेती करत असाल तर रात्री पिकांना पाणी द्यायला , दारं धरणे म्हणतो आम्ही त्याला घेवून जा कारभरणीला. स्त्री ला शरीर सुखाची ओढ तेंव्हाच वाटेल जेंव्हा फोर प्लेला तुम्ही महत्व द्याल.ती स्वतः तुमच्या सहवासाचे निमित्त शोधेल म्हणून फोर प्ले स्किप करू नका . प्रायव्हसी कशी मिळवायची ,नाविन्य कसे टिकवून ठेवायचे तुमच्या हातात आहे .स्त्री जेंव्हा अशी फोरप्ले मध्ये फुलते ती स्वतः जोडीदाराला सेक्स ची मागणी करते . स्त्रियांनी पण हे अनमोल क्षण घालवून पार 40 ओलांडून 45 वर्षानंतर गळे काढण्यापेक्षा थोडे लवकर भानावर यावे . आयुष्य कसं पारिजातका सारखं जगावं थोडं असलं तरी सुगंधी . ©️ #प्राजक्ता_पाटील

Post image
👍 ❤️ 👌 41
Image
लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान
2/27/2025, 6:35:10 AM

*#लैंगिक_आरोग्य भाग-6* https://whatsapp.com/channel/0029VaAlVfn7j6gFqGrpl72t #आफ्टर_प्ले फोरप्लेची जेवढी गरज आहे तेवढीच गरज आहे आफ्टरप्लेची.माझ्या मनात होते आपल्याला आफ्टर प्लेवर पण पोस्ट लिहायला हवी. सेक्स एजुकेशन ही महत्वाची आणि आपल्या जीवनातील अविभाज्य गोष्ट असूनही त्यावर बोलणे ,माहिती मिळवणे लोक वर्ज्य समजतात. सध्या काही संस्था,संघटना #चला_लैंगिकतेवर_बोलू_काही अशा विषयावर #वेबिनार घेत आहेत. फोरप्ले हा भाग जेवढा महत्वाचा असतो तसाच #आफ्टर_प्ले पण महत्वाचा. फोरप्ले जेवढा छान तेवढा सेक्स आनंददाई होईल. तसेच आफ्टरप्ले जेवढे छान तेवढं नातं सुदृढ़ होईल. बऱ्याच लोकांना सवय असते इंटरकॉर्स झाला की लगेच बाजूला व्हायचे ,काही काही लोक इंटरकोर्स साठी जोडीदार तयार व्हावा म्हणून फोरप्ले करतील पण आफ्टर प्ले टाळतील.खूप थोडे लोकं आफ्टर प्ले करतील. काय असतो आफ्टर प्ले इंटरकोर्स नंतर जोडीदाराला एकटे न सोडणे . त्याला थोड्या वेळासाठी बिलगून रहाणे ,गप्पा मारणे .शरीर जे एका लयित आलेले असते ती कंपनं असतात ती शांत व्हावी म्हणून जोडीदार आपल्या जोडीदाराला बिलागतो.हे शक्यतो स्त्री जास्त करते.तिला यातून एक प्रकारे आश्वासन , सुरक्षितता, स्थिरता ,हक्क असं सगळं यातून मिळते . इंटरकोर्स दरम्यान भावोत्कट झालेल्या तिला /त्याला जोडीदाराच्या कुशीत शिरून बसायचे असते .पण दुसरा जर ताडकन वेगळा झाला तर ज्याला तो स्पर्श हवा आहे त्याचं मन दुखावलं जातं आपल्याकडे सेक्स वर बोललं जात नाही त्यामुळे आपण सेक्स दरम्यान दुखवलो गेलो हे पार्टनर दुसऱ्या पार्टनरला सांगत नाही .ते दुसऱ्या रुपात प्रकट होते . जसे की... 1. सेक्सचा तिरस्कार वाटणे. 2.जोडीदाराचा राग येणे .तो राग इतर मार्गाने व्यक्त करणे. 3.आपला जोडीदार आपल्याला फक्त वापरत आहे ही भावना बळावते . 4.नात्यात नकारात्मकता निर्माण होते. 5.पुढच्यावेळी जोडीदार सेक्स साठी जवळ आला तर नकार देवून त्या अपमानाचा बदला घेतला जातो . इंटरकोर्स नंतर आपल्या जोडीदारा सामवेत थोडा वेळ एकत्र घालवणे म्हणजे #आफ्टरप्ले. यामुळे आपल्या जोडीदारा सोबतची भावनिक गुंतवणूक किंवा जवळीक अधिक दृढ़ होते. जसे आपण पूर्ण जेवण म्हणजे स्टार्टर (जेवणा आधी तोंड खवळण्यासाठीचे पदार्थ) , मेन कोर्स (मुख्य जेवण) आणि शेवटी डेझर्ट ( जेवण झाल्यावर तोंड गोड करणे) याला म्हणतो तसे .. सेक्सचे तीन टप्पे आहेत.तिन्ही महत्वाचे आहेत. 1.फोरप्ले 2. इंटरकोर्स 3.आफ्टरप्ले #आफ्टर_प्ले_करताना..... 1.जोडीदारा पासुन लगेच बाजूला जाऊ नका. थोड्यावेळ बिलगुन गप्पा मारत बसा. 2. डोक्यावरुन ,पाठिवरुन प्रेमाने हात फिरवत रहा. 3.जोडीदाराला जवळ घेवून पाठीवर हलकेच थोपटा. 4.एकत्र चहा/कॉफी घेत गप्पा मारा. 5.एकत्र अंघोळ करणे हा पर्याय पण छान आहे. 6.जोक सांगणे,मस्ती,चेष्टा मस्करी ,एकमेकांच्या आवडी,छंद यावर बोलणे. 7.पाठीला ,डोक्याला ,पायाला मसाज देत गप्पा मारणे (हे फोरप्ले साठी पण करता येते.) 8. थंडीच्या दिवसात घरात टोपल्यात ,शेगडी (कोळसा,भूसा) शेकोटी वर शेकत गप्पा , मस्करी या व्यतिरिक्त तुमचा जोडीदार आणि तुम्ही तुमची कल्पकता वापरु शकता. या सगळ्यांमुळे आपला जोडीदार आपल्याला खुप महत्व देतो ,जवळचे मानतो ही भावना मनात निर्माण होते. त्यामुळे जोडीदार अधिक खुलतो. कित्येकदा जोडीदार इंटरकोर्स नंतर जास्त खुलतो आणि त्यावेळी तो संवाद करण्याच्या मुड मध्ये असतो. त्यामुळे पती/पत्नी , प्रियकर/प्रेयसी यांच्यात आफ्टर प्ले नंतर मोकळा संवाद होतो.तो टाळणे म्हणजे एकमेकांच्यात भावनिक गुंतवणूक टाळणे .नात्यात दुरावा निर्माण करणे. #हे_करू_नका 1.इंटरकोर्स नंतर लगेच जोडीदारा पासुन दूर जाणे. 2. लगेच आपली जागा पकडून झोपी जाणे. 3. इंटरकोर्स नंतर जोडीदाराशी तुटक वागणे. 4.जोडीदाराकडे लगेच पाठ फिरवुन झोपी जाणे. 5. जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून सकाळी लवकर उठायचे आहे. म्हणून संवाद टाळणे. तुम्ही हे कराल तर जोडीदारासोबत भावनिक जवळीक निर्माण करण्याची संधी गमावून बसाल. असे वारंवार घडल्यास जोड़ीदाराच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर कमी होईल.मनात दुरावा निर्माण होईल,अति झाल्यास चिडचिड होईल. म्हणून आफ्टरप्ले कधीही टाळू नका. ©️ #प्राजक्ता_पाटील

Post image
👍 👌 ❤️ 🙏 😂 23
Image
लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान
2/17/2025, 5:55:11 PM

*#लैंगिक_आरोग्य -भाग 1* आपण अजुनही लैंगिक समस्येवर किंवा त्या विषयावर बिचकतच बोलत असतो.लोक एकवेळ वात्रट मीम किंवा जोक करतील पण मुळात #सेक्स या विषयावर गंभीर चर्चा मात्र करत नाहीत.चर्चा करून आपली समस्या मांडल्याशिवाय ती समस्या सुटत नाही. #पुरुषभान_संवाद_मंच , #अंधश्रद्धा_निर्मूलन_समिती आणि अनेक संस्था यविषयावर चर्चासत्र आयोजित करत असतात. याविषयावर गैरसमज जास्त आहेत.तरीही लोक सेक्सोलॉजिस्ट कडे न जाता ऑनलाईन विदेशी वेबसाईटचा रस्ता धरतात जी की शुद्ध फसवणुक असते. एरवी चर्चा करताना लोक “आम्हाला कसलीच समस्या नाही” “आम्ही त्यात माहिर आहोत.”, “आम्हीच लोकांना शिकवु शकतो .” अशी विधानं करतील.पण सत्य हे आहे की कित्येक स्त्रियांना लैंगिक तृप्ती मिळत नाही .त्याचे कारण स्त्री /पुरूषांचे याबाबत अज्ञान. आपण कित्येक ठिकाणी नवरा-बायको,प्रियकर-प्रेयसी यांच्यामधील सतत होणाऱ्या भांडणाचा अभ्यास केला तर त्याच्या मुळाशी लैंगिक अतृप्ती असते.पण स्पष्ट बोलून दाखवले जात नाही.फोरप्ले,आफ्टरप्ले चा आभाव,शारीरिक अस्वच्छता हे पण तुमच्या निकोप लैंगिक संबंधामध्ये बाधा आणते. एक जोडपं नेहमी एका कारणावरुन भांडायचं की, बायको नेहमी शारीरिक संबंध झाले की अंघोळ करायची मग ते दुपारी होवोत अथवा रात्री दीड वाजता.ते अपवित्र आहे हे बायकोच्या डोक्यात एवढे फिट बसले होते की किती नवऱ्याने समजवून सांगितले तरी ती लक्षात घेत नसे त्यामुळे तिच्या अश्या वागण्याने नवरा वैतागुन गेला कारण सगळ्यांना माहित व्हायचे घरात .शेवटी ते मतभेद एवढे विकोपाला गेले की त्याने बाहेर लफडी करायला सुरुवात केली. लैंगिक समस्या ही नेहमी मानसिकतेशी संबंधित असते.तुमचे शारीरिक,मानसिक आरोग्य चांगले असेल तर तुम्हाला कसलेही औषध घ्यायची गरज नसते. #शक्ती_वाढवा ही औषध निव्वळ फसवणूक असते.इतरांची ऐकलेली अतिरंजित वर्णने आणि अतिरंजित पॉर्न विडिओ ज्यासाठी कित्येकवेळा थांबत शूटिंग घेतलेली असते. कित्येक अशास्त्रीय ,अघोरी गोष्टी फक्त पैशासाठी शूट केलेल्या असतात ज्यात पॉर्न स्टारला खुपदा कायमची दुखपत होत असते.पण बघणारे बरेच लोकं ते खरं समजून बसतात.त्याच्या आहारी जातात . काही अपघात किंवा शारीरिक व्यंग असेल तरच समस्या निर्माण होतात व औषधोपचार घ्यायची गरज पडेल अन्यथा औषध घ्यायची गरजच नसते. कित्येकदा स्त्री आपल्याला लैंगिक अतृप्ती मिळते हे बोलून दाखवत नाही तो राग इतर ठिकाणी काढते आणि समजा एखादी स्त्री बोलून दाखवत असेल तर ती अतिशहाणी समजली जाते.पुरुष आपल्याकडे स्त्रीला खुलवण्याचे कौशल्य नाही हे मान्य करत नाहीत. स्वतःशी मान्य केले तर सुधारणा करता येते. सेक्सओलॉजिस्ट यात मदत करू शकतात. काही पुरुषांना मानसिक दडपण येत असते यासाठी काउन्सलिंग करून घेता येईल. हे मान्य करणे म्हणजे मर्दानगी कमी असणे नव्हे.हा एक मोठा गैरसमज असतो.पण सत्य हे आहे की कित्येक म्हणजे जवळ जवळ 70 ते 80 % स्त्रिया लैंगिक दृष्टया अतृप्त आहेत.हे मी नाही सर्वेक्षण सांगते . मुलं झाली म्हणजे आपण लैंगिक क्रिडे मध्ये पारंगत झालो असे नसते. फक्त मुल होण्यासाठी नाही तर आनंदी वैवाहिक जीवनासाठी सेक्स गरजेचे आहे. बऱ्याच स्त्रियांना असे वाटत असते की मी जोड़ीदाराला लैंगिक सुख देते. तिला पण ते हवे असते आणि ती पण सुख घेत असते हे तिच्या डोक्यातच येत नाही. मी सुख देते आणि जोडीदार घेतो असेच तिला वाटत असते.या भावने पोटी आपले काही हट्ट पुर्ण करून घेण्यासाठी पुरुषांची लैंगिक अडवणुक हे हत्यारासारखं वापरते. आपल्या लैंगिक इच्छा आणि तृप्ती कशात आहे यासंबंधी जोड़ीदाराशी स्त्री ने बोलले पाहिजे .तो स्त्रीचा हक्क आहे. पुरुषांनी पण फक्त औषधे न घेता सेक्सओलॉजिस्टचे सल्ला मार्गदर्शन पण घेतले पाहिजे. विठ्ठल प्रभु यांचे “निरामय कामजीवन" वात्सायनचे “कामसुत्र” अतिशय उपयुक्त आहे. सगळ्यात महत्वाचं मानवी गरज आणि मानवाधिकार म्हणून लैंगिक ज्ञान हवे . सामाजिक सुव्यवस्था म्हणून लग्न बंधन हवे असेल तर लैंगिक कामपूर्ती ही जबाबदारी घ्यावी अन्यथा विवाह बाह्य संबंध मान्य करावे. ©️ #प्राजक्ता_पाटील https://whatsapp.com/channel/0029VaAlVfn7j6gFqGrpl72t

👍 👌 ❤️ 14
लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान
2/16/2025, 6:22:07 PM

*प्रश्न- कोणत्याही व्यसनाने पुरुषांच्या उद्दीपन, कामपूर्तीवर परिणाम होतो का ?* *उत्तर*- दारू, सिगारेट, तंबाखू, अफू, गांजा यापैकी कशाचेही व्यसन असलेल्या पुरुषांत नपुंसकत्व, वीर्यपतन न होणे, शुक्राणू कमी निर्माण होणे, शुक्राणूमध्ये दोष निर्माण होणे, यापैकी काहीही होऊ शकते. काहींना कोणतीही लैंगिक समस्या येत नाही पण मेंदू, हृदय, किडनी, यकृत, फुफ्फुस या अवयवांना समस्या निर्माण होते. नक्की काय होईल हे सांगता येत नाही. पण शरीराला अपाय नक्की करते. https://whatsapp.com/channel/0029VaAlVfn7j6gFqGrpl72t

👍 12
लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान
1/30/2025, 3:01:46 PM

*"संबंधांचे नियम प्रत्येक विवाहित जोडप्याने सराव करणे आवश्यक आहे."* https://whatsapp.com/channel/0029VaAlVfn7j6gFqGrpl72t तुम्ही नुकतेच नातेसंबंधात प्रवेश करत असाल किंवा काही काळासाठी नात्यात आहात, नियम तुम्हाला ते पुढील स्तरावर नेण्यात मदत करतात. खालील नियमांचे पालन करा आणि जादूचे कार्य पहा: 1. कोणत्याही अटीशिवाय प्रेम करा प्रेमाला अटी असू शकत नाहीत. जेव्हा "केवळ जर" तुमच्या नात्यात शिरते तेव्हा हे सर्व खूप भौतिकवादी बनते. तुमच्या जोडीदाराने तुमच्यापेक्षा जास्त कमाई केली तरच तुम्ही प्रेम करू शकता, जर त्याने दर महिन्याला तुम्हाला भेटवस्तू खरेदी केल्या असतील, ती नेहमी सुंदर दिसली तरच तुम्ही प्रेम करू शकता अशा अटी तुमच्यात असू शकत नाहीत. तुमचे पालक तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतात तसे तुमच्या जोडीदारावर प्रेम करा. 2. तुमचे नाते हे तुमचे प्राधान्य आहे तुमच्या नात्याला तुमची सर्वोच्च प्राथमिकता बनवा. तुमच्या नात्यात वेळ आणि मेहनत गुंतवा आणि ते अधिक चांगले करण्यासाठी सतत प्रयत्न करा. 3. तुमचे कम्युनिकेशन चॅनल नेहमी उघडे ठेवा संप्रेषणाशिवाय, आपण आपल्या नातेसंबंधात वेगळे होऊ शकता. तुमचा संवाद खुला आणि प्रामाणिक असू द्या. तुम्ही कितीही व्यस्त किंवा थकलेले असलात तरी, त्यामुळे तुमचा संवाद खंडित होऊ देऊ नका. 4. शक्य तितक्या वेळा मिठी मारा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत त्याचा समावेश करा आणि तुमची मिठी जास्त काळ टिकेल. मिठी मारल्याने ऑक्सिटोसिन (प्रेम संप्रेरक) पातळी वाढते आणि कॉर्टिसॉल (स्ट्रेस हार्मोन) कमी होते. 5. उदारपणे सेक्स करा सेक्स शेड्यूल करू नका, ते त्वरित होऊ द्या. तेव्हाच ते रोमांचक बनते आणि तुमच्यातील जवळीक वाढते. सेक्स करताना कोणतीही सबब तुमच्या मार्गात येऊ देऊ नका. 6. दर्जेदार वेळ एकत्र घालवा तुम्हाला डेट नाईटवर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी रोमँटिक डिनर देखील करू शकता, फक्त बागेत किंवा बाल्कनीत बसा आणि तुमच्या आठवणींना उजाळा द्या किंवा तुमचा आवडता टीव्ही कार्यक्रम एकत्र पहा. जवळ राहण्यासाठी तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून विश्रांती घेण्याची कल्पना आहे. 7. विश्वास निर्माण करण्यासाठी प्रामाणिक आणि सत्यवादी व्हा प्रामाणिकपणा आणि सत्यतेवर विश्वास विकसित होतो. आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी अधूनमधून किरकोळ आणि निरुपद्रवी खोटे बोलण्याची परवानगी आहे परंतु फसवणूक आणि निष्ठा नसणे यांना नातेसंबंधात स्थान नाही. तुमच्या जोडीदाराची प्रेमाची भाषा जाणून घ्या. मग ते एकत्र दर्जेदार वेळ घालवणे असो, शारीरिक जवळीक असो किंवा पुष्टी देणारे शब्द, ते काय समजून घेणे असो सर्वात जास्त आनंद घ्या तुमचे बंधन मजबूत करेल. 8. टीका करा पण दुखवू नका जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची चांगली बनवण्यासाठी टीका करायची असेल, तर ती टीका रचनात्मक आणि सकारात्मक असावी. तुमच्या जोडीदाराला टीकेमागील हेतू समजून घेण्यात मदत करा. 9. एकमेकांच्या पाठीशी उभे रहा आम्हाला आशा आहे की कठीण प्रसंग तुमच्या आयुष्याला स्पर्श करणार नाहीत, परंतु या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पाठीशी उभे राहून एकमेकांवरील तुमचे अतुलनीय प्रेम सिद्ध केले पाहिजे. तेव्हाच तुमचे नाते घट्ट होते. 10. तुमच्या भागीदारातील चांगल्या गोष्टींची प्रशंसा करा हे काम कितीही सोपे किंवा नियमित असले तरी तुमच्या जोडीदाराचे कौतुक करा आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचे आभार माना. हे दर्शविते की तुम्ही त्यांचा आदर आणि कदर करता, या दोन्ही गोष्टी दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यासाठी महत्त्वाच्या आहेत. 11. विशेष दिवस साजरे करा आपले महत्वाचे दिवस विसरू नका नाते - ज्या दिवशी तुम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटलात, तुमची पहिली तारीख, ज्या दिवशी तुमच्या जोडीदाराने तुम्हाला प्रपोज केले होते आणि अर्थातच तुमचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस. तुमची एकजूट साजरी करा आणि मनमोहक आठवणी तयार करा. 12. तुमच्या भागीदाराला समजून घ्या आणि सहानुभूती दाखवा जर तुमचा जोडीदार एखाद्या दिवशी वाईट स्वभावाचा असेल आणि तुमच्यावर ओरडत असेल तर सहानुभूती दाखवा आणि त्याच स्वरात उत्तर देण्याचा मोह नियंत्रित करा. त्यांना कदाचित कामावर कठीण दिवस गेला असेल किंवा तणाव वाटत असेल. त्यांचा दृष्टीकोन समजून घ्या, त्यांच्याशी सहानुभूती दाखवा आणि जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा शोधा. त्यांना काय त्रास देत आहे. 13. माफ करा आणि विसरा चुका होतात. जर तुमच्या जोडीदाराने तुम्हाला दुखावले असेल तर त्याला माफ करा आणि विसरून जा. जेव्हा तुम्ही चूक कराल तेव्हा क्षमा त्यांना तेच करण्यास प्रोत्साहित करेल. कृपया लक्षात ठेवा: जेव्हा जेव्हा भांडण होते, तेव्हा लक्षात ठेवा की ते "तुम्ही दोघे" आहात. तुम्ही आणि तुमचा जोडीदार नाही. 14. तुमची वचने ठेवा ते तुम्हाला विश्वासार्ह, विश्वासार्ह बनवते आणि तुमची विश्वासार्हता वाढवते 15. सर्वोत्कृष्ट करा आणि आपण जे करू शकता ते सर्वोत्तम व्हा. आपण सर्वजण टीकेला असुरक्षित आहोत आणि काहीतरी चुकीचे केल्याची आणि त्याबद्दल टीका होण्याची भीती वाटते. तुमच्या जोडीदाराच्या प्रतिक्रियेची पर्वा न करता तुमच्या नात्याला सर्वोत्तम द्या. तुम्ही करू शकता इतकेच आहे; तुमचा पार्टनर त्यावर कसा प्रतिक्रिया देतो हे तुमच्या नियंत्रणात नाही.

👍 ❤️ 👌 😢 😮 🙏 🍫 😂 89
Link copied to clipboard!