❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
February 26, 2025 at 03:54 AM
🔴🔷 चालू घडामोडी :- 25 फेब्रुवारी 2025 ◆ महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी 2027 साली कुंभमेळा होणार आहे. ◆ जर्मनी मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ने 120 जागा जिंकल्या आहेत. ◆ देशातील 60 टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. ◆ 2024 मध्ये फ्रान्स देशाला सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. ◆ रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरवात झाली होती.[रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला 3 वर्षे पूर्ण झाली आहेत.] ◆ भोपाळ याठिकाणी आयोजित दोन दिवसीय जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ◆ टाईम आउट च्या सर्वेक्षणानुसार 2025 साठीच्या सर्वोत्तम 50 शहरांच्या यादीत केपटाऊन ने अव्वल स्थान पटकावले आहे. ◆ टाईम आउट च्या सर्वेक्षणानुसार 2025 साठीच्या सर्वोत्तम 50 शहरांच्या यादीत मुंबई ने 49वे स्थान मिळवले आहे. ◆ जागतिक साखर उत्पादनात भारताचा 20 टक्के वाट आहे. ◆ पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी आफ्रिका देशातील शिखर किल्लीमांजरो यशस्वीपणे पार केले आहे. ◆ NCSI सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळास प्रदान करण्यात आला आहे. ◆ हरियाणा राज्य सरकारने साक्षीदार संरक्षण योजना लाँच केली आहे. ◆ पहिली महिला शांतीरक्षक परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. ◆ भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनिल भारती मित्तल यांना नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (केबीई) हा किताब प्रदान करण्यात आला आहे.[ब्रिटिश सार्वभौम नागरिकांकडून देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान आहे.] ◆ इंडियन सुपर लीग चे विजेतेपद मोहन बागान सुपर जायंट ने पटकावले आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍 1

Comments