CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
February 20, 2025 at 04:55 AM
🔷 *चालू घडामोडी :- 19 फेब्रुवारी 2025* ◆ *महाराष्ट्र राज्य सरकारने सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली असून त्याचा कार्यकाळ 01 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 असणार आहे.* ◆ FIH प्रो हॉकी लीग स्पर्धा भारत देशात सुरु आहे. ◆ *आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद इंडोनेशिया देशाने पटकावले आहे.* ◆ आशिया मिश्र संघ बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन चीन येथे करण्यात आले होते. ◆ *आशिया मिश्र संघ बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारताने पाचवे स्थान पटकावले आहे.* ◆ गुजरात राज्य सरकारने G-Safal योजना सुरू केली आहे. ◆ *ओमान मध्ये आयोजित केलेल्या भारतीय महासागर संमेलनाला 60 पेक्षा अधिक देश सामील झाले होते.* ◆ तमिळ कवी तिरुवल्लूवर यांच्या पुतळ्याचे फिलिपाईन्स मध्ये हर्ष कुमार जैन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. ◆ *केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबई या ठिकाणी सचल आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन केले आहे.* ◆ बहुपक्षीय नौदल सराव कमांडो 2025 इंडोनेशिया(बाली येथे) देशात आयोजित करण्यात आला आहे. ◆ *सचल आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात आले आहे.* ◆ सुरेश के रेड्डी यांची इजिप्त देशांतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ *PM फसल विमा योजना 18 फेब्रुवारी 2016 साली सुरू करण्यात आली होती.* ◆ PM फसल विमा योजनेला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ *माहिती संकलन :- Avinash Chumble* ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint

Comments