
Dr. Pareexit Shevde
February 18, 2025 at 03:34 PM
#वैद्यराज
"वैद्यराज; हा माझा भाऊ आहे. माझ्या उपचारासंदर्भात त्याला काही शंका आहेत. विचारू दे?"
"हो. अगदी जरूर." वैद्यराजांनी हसत परवानगी दिली.
"माझा भाऊ तुमच्याकडे पोटासाठी उपचार घेतोय. त्याला तुम्ही चक्क रोज हनुमान चालीसा म्हणायचा सल्ला दिलात? हे असं मंत्र तंत्र सांगणं कितपत वैज्ञानिक वाटतं तुम्हाला वैद्यराज?"
"अरे; त्याचा पचनाचा त्रास मानसिक ताणामुळे आहे. म्हणून त्याला आपण तो सल्ला दिला." वैद्यराज नेमकेपणाने बोलले.
"अहो ही तर तुम्ही तुमच्या सल्ल्याची पाठराखण करताय. आजच्या विज्ञानाच्या युगात हे शोभतं का?" भाऊ आता वैतागू लागला होता.
"Box breathing navy seal method हे शब्द ऐकले आहेस?" वैद्यराजांनी सौम्य शब्दांत विचारलं.
"हो. ४ सेकंद प्रत्येकी श्वास आत घ्या, धरून ठेवा, बाहेर सोडा आणि पुन्हा धरून ठेवा. पण त्याचा इथे काय संबंध?"
"या पद्धतीवर आजच्या तुझ्या विज्ञानाने संशोधन करून मानसिक ताण कमी करायला याचा उपयोग होतो म्हणून सांगितलं आहे ना?" वैद्यराजांनी उत्तर न देता प्रतिप्रश्न केला.
"हो सांगितलं आहे. प्रयोगच झाले आहेत तसे. आम्ही प्रयोग करून मगच मान्यता देतो. पण त्याचा हनुमान चालीसा पठणाशी काय संबंध?!" आता मात्र भाऊ चांगलाच त्रासला होता.
"तुझ्या भावाला विचार बरं मी कशा पद्धतीने हनुमान चालीसा म्हणायला सांगितली?.....
जय हनुमान ज्ञान गुन सागर। (श्वास हळूहळू आत घ्या)
जय कपीस तिहुं लोक उजागर।। (श्वास रोखून धरा)
रामदूत अतुलित बल धामा। (श्वास हळूहळू सोडा)
अंजनि-पुत्र पवनसुत नामा।। (श्वास रोखून धरा)
मिळाले ना तुझ्या विज्ञानाने सांगितलेले फायदे? यावरही संशोधन झालंय बरं! कुठे ते आता तू शोधून काढ. माझं काम माझ्या पेशंटची काळजी घेणं आहे. तुझ्या वैज्ञानिक paramameter वरही ती झाली आणि आम्ही मारुतीरायाला "मनोजव" असं म्हणतो. त्यामुळे आमच्या श्रद्धेनेही ते काम करतीलच याची खात्री आहे. झालं का शंका निरसन? तुझी परवानगी असेल तर पुढचा पेशंट तपासायला घेऊ?!"
- वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति

👍
❤️
🙏
🪔
121