Dr. Pareexit Shevde
Dr. Pareexit Shevde
February 25, 2025 at 10:32 AM
#महत्त्वाचे इच्छा असूनही कुंभाला जाता आलं नाही म्हणून चुटपुट लागली आहे? उद्याची रात्र ही कमतरता भरून काढू शकेल! आपल्या शरीरातल्या त्रिवेणी संगमात स्नान करण्याची संधी चुकवू नका. इडा, पिंगला आणि सुषुम्ना हा आपल्या शरीरातला त्रिवेणी संगम आहे. महाशिवरात्रीला इडा, पिंगला या नैसर्गिकरीत्या अधिक सचेतन असतात. तर सुषुम्नेला आपल्या साधनेची जोड दिल्यास काही अभूतपूर्व अनुभूती मिळू शकते. शक्य आहे त्यांनी दिवसभर उपवास करा. शक्य नाही असे; रुग्ण, गर्भिणी, बाल आणि वृद्ध यांनी तेही करण्याची आवश्यकता नाही. शिवमहिम्न, शिवसहस्रनाम यांचं दिवसभर यथाशक्ति पठण, श्रवण करू शकता. रात्रीच्या चारही प्रहरांत देवघरातल्या शिवपिंडीवर अभिषेक करताना नम: शिवाय हा पंचाक्षरी मंत्र किंवा मृत्युंजय मंत्राचं मनन करू शकता. चारही प्रहरांत शक्य नसलेल्यांनी किमान रात्री साडेबारा ते दीड ही वेळ चुकवू नये. ज्या आयुर्वेद विद्यार्थी / वैद्य यांच्यासाठी खास; दूध + साखर आणि नंतर जल असा अभिषेक महादेवांना करणे इष्ट. अभिषेकसमयी अघोर मंत्राचा जप लाभदायक. चारही प्रहरांत किमान एक अभिषेक करा. अगदीच अशक्य असल्यास रात्री साडेबारा ते दीड ही वेळ मुळीच चुकवू नका. वर सांगितलेलं "किमान" गटात आहे. "अधिकस्य अधिकं फलम्|" - वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
🙏 ❤️ 👍 👏 😮 🪔 80

Comments