
Dr. Pareexit Shevde
February 26, 2025 at 02:17 AM
महाशिवरात्री 🚩
त्रिदेवांत केवळ महादेवांच्या पत्नीने त्यांना विविध प्रश्न विचारून विविध विद्या प्रकट केलेल्या आढळतात. कधी हा संवाद शिव पार्वती म्हणून, कधी महादेव महादेवी म्हणून, तर कधी भैरव भैरवी स्वरूपात होताना दिसतो.
जगदंबिकेला ज्ञात नाही; असं काहीतरी असेल का? पण तरीही साधकांना सुकर व्हावं म्हणून संवाद स्वरूपात हे ज्ञान तिने उलगडून दाखवलं आहे. रसशास्त्राचे अनेक संदर्भही अशा संवादांत मिळतात. 'शिव शक्ति' मीलनातून सृष्टीउत्पत्ती होते. याकरताच अन्यत्र विधान नसलेली विवाह दिनाची साधना म्हणजे महाशिवरात्री. शिवाने निर्गुणातून सगुण साकार स्वरूपात व्यक्त होण्याची रात्र; शिवाने तांडवातून अक्षय्य ऊर्जा निर्माण करण्याची रात्र; सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान या पाचही स्वरूपांत साधकांवर आणि पांचभौतिक जगावर अनुग्रह करण्याची रात्र!
महादेव महादेव महादेवेति यो वदेत्।
एकेन मुक्तिमाप्नोति द्वाभ्यां शम्भुऋणी भवेत् ||
- वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
🙏
❤️
👍
🪔
84