𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
February 24, 2025 at 02:01 AM
📚 *वाक्यप्रचार व अर्थ* 📚 https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g 1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे 2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे 3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे 4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे 5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे 6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे 7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे 8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे 9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे 10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे 11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे 12)रामराम ठोकणे - निरोप घेणे 13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे 14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g 15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे 16) वर्ज्य करणे - टाकणे 17) काडीमोड करणे - संबंध तोडणे 18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे 19) अगतिक होणे - उपाय न चालणे 20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे 21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे 22) इडापिडा टळणे - संकट जाणे 23) उतराई होणे - उपकार फेडणे 24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे 25) लकडा लावणे - सारखी घाई करणे 26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे 27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे 28)कागाळी करणे - तक्रार करणे 29) खांदा देणे - मदत करणे https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g 30) खोबरे करणे - नाश करणे 31) गय करणे - क्षमा करणे 32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे 33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे 34) जीव ओतणे - मन लावून काम करणे 35) सुपारी देणे - आमंत्रण देणे 36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे 37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे 38) नामोहरम होणे - पराभूत होणे 39) पदर पसरणे - याचना करणे 40) पाणउतारा करणे - अपमान करणे 41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे 42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास  क्षमता कमी पडणे 43) हिरमुसले होणे - नाराज होणे 44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे 45) विटून जाणे - त्रासणे 46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे 47) फडशा पाडणे - संपवणे 48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे 49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे 50)धिंडवडे निघणे - फजिती होणे 61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे 62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे 63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे 64)हातपाय गाळणे - धीर सोडणे https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g 65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील काम न करता कागदी पराक्रम गाजविणे 66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे 67)झाकड पडणे - अंधार पडणे 68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे 69)टोपी उडवणे - टवाळी करणे 70)पाणी पाजणे - पराभव करणे 71)वहिवाट असणे - रीत असणे 72)छी थू होणे - नाचक्की होणे 73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे 74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे 75)दिवा विझणे - मरण येणे 76)मूठमाती देणे - शेवट करणे 77) सुगावा लागणे - अंदाज लागणे 78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे 79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे 80)कानाशी लागणे - चहाडी करणे 81)किटाळ करणे - आरोप होणे 82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे 83)हातावर तुरी देणे - फसविणे 84)बेगमी करणे - साठा करणे 85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे 86)पोटात तुटणे - वाईट वाटणे 87)नख लावणे - नाश करणे 88)डोळो निवणे - समाधान होणे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 *स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....* https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Comments