OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
February 18, 2025 at 07:55 AM
*वसंतराव नाईक महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादेवाढबाबत प्रस्ताव तयार करावा* *मंत्री अतुल सावे* मुंबई, दि. १७ : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा वाढविण्याबाबतही प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 126 वी बैठक मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात पार पडली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत, संचालक मंडळाच्या १२५ व्या सभेच्या इतिवृत्तास व केलेल्या कार्यवाहीस मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर, बैठकीत युवक-युवतींकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण आणि महिलांसाठी महिला समाज सिद्धी योजना सुरू करण्याबाबत, तसेच विभागातील सहायक संचालक यांची नेमणूक करण्याच्या विषयावर चर्चा झाली. त्याचप्रमाणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने मानधनावर घेण्याबाबतही सूचना मंत्री अतुल सावे यांनी केल्या. महामंडळाच्या कार्यप्रणालीला अधिक सुलभ व प्रभावी बनवावी जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येईल.महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत एकूण १८ महामंडळे स्थापन करण्यात आली असून या सर्व महामंडळाची एक सारखी कार्यपद्धती तयार करावी, असे निर्देश श्री. सावे यांनी दिले. ******
Image from OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA: *वसंतराव नाईक महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादेवाढबाबत प्रस्ताव तयार क...
👍 ❤️ 🙏 😢 😂 😮 58

Comments