Mahesh Landge
                                
                                    
                                        
                                    
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 28, 2025 at 11:31 AM
                               
                            
                        
                            अभिमान पिंपरी-चिंचवडकरांचा..! 
महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांचा कृती आराखडा उपक्रमात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही सर्वोत्तम कामगिरी करणारी महापालिका ठरली आहे. ई-प्रशासन, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, स्वच्छता, अनावश्यक कार्यालयीन कागदपत्रांची विल्हेवाट, नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि आधुनिक सार्वजनिक तक्रार निवारण प्रणाली यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्याने महापालिकेला हे यश प्राप्त झाले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मा. शेखरजी सिंह यांनी हा बहुमान स्विकारला आहे. 
महापालिका प्रशासन, सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मन:पूर्वक अभिनंदन..!
https://www.facebook.com/share/p/1DHh785tEk/
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                        
                                            👌
                                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            🚩
                                        
                                    
                                    
                                        17