Mahesh Landge WhatsApp Channel

Mahesh Landge

20.1K subscribers

Verified Channel

About Mahesh Landge

BJP MLA - Bhosari Constituency Parivartan Helpline - 9379909090 Wrestler 💪 Founder - Maheshdada Landge Sports foundation

Similar Channels

Swipe to see more

Posts

Mahesh Landge
Mahesh Landge
2/27/2025, 8:00:30 AM

भारतरत्न,पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेले चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख म्हणजे आदर्शवत व्यक्तिमत्व.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघाचे काम करत त्यांनी आदर्शवत राजकारणाचा पाया घालून दिला. विधायक कामांची उभारणी करण्याचा ध्यास घेतलेल्या नानाजींनी जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रिपद नाकारले. दीनदयाळ संशोधन संस्था स्थापन करून त्यांनी सिंचन, गोवंश, कृषी पद्धतींचा विकास व प्रसार, गुरुकुल पद्धतीने शालेय शिक्षण, स्वयंरोजगाराचा पुरस्कार केला.पुणे विद्यापीठाने ’डॉक्टर ऑफ लेटर्स’ पदवी प्रदान करून त्यांना गौरविले आहे. राजकारणातील चाणक्य, समाजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व नानाजी देशमुख यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!! https://www.facebook.com/share/p/1A95y2HWxy/

🙏 👍 5
Mahesh Landge
Mahesh Landge
2/27/2025, 11:00:16 AM

महाशिवरात्री निमित्त प्रतिवर्षी महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पुढाकाराने कीर्तन महोत्सव आयोजित केला जातो. आज काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाचा समारोप झाला. या भक्तीमय सोहळ्याला औसा विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार मा. श्री. अभिमन्यू पवार यांनी भेट दिली. https://www.facebook.com/share/p/18wWCHK9xs/

❤️ 👍 🙏 🥰 14
Mahesh Landge
Mahesh Landge
2/28/2025, 11:31:57 AM

अभिमान पिंपरी-चिंचवडकरांचा..! महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांचा कृती आराखडा उपक्रमात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही सर्वोत्तम कामगिरी करणारी महापालिका ठरली आहे. ई-प्रशासन, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, स्वच्छता, अनावश्यक कार्यालयीन कागदपत्रांची विल्हेवाट, नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि आधुनिक सार्वजनिक तक्रार निवारण प्रणाली यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्याने महापालिकेला हे यश प्राप्त झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मा. शेखरजी सिंह यांनी हा बहुमान स्विकारला आहे. महापालिका प्रशासन, सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मन:पूर्वक अभिनंदन..! https://www.facebook.com/share/p/1DHh785tEk/

👍 ❤️ 👌 🙏 🚩 17
Mahesh Landge
Mahesh Landge
2/27/2025, 6:37:53 AM

औसा विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार आणि माझे विधिमंडळातील सहकारी मा. श्री. अभिमन्यू पवार यांनी माझ्या शितलबाग- भोसरी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. या ठिकाणी औसा आणि परिसरातून पिंपरी-चिंचवडमध्ये नोकरी-व्यावसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. ‘‘संतभूमी’’ पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार श्री. अभिमन्यू पवार यांचे मन:पूर्वक स्वागत करीत आहोत. https://www.facebook.com/share/p/1AHVwwrF2q/

👍 🙏 9
Mahesh Landge
Mahesh Landge
2/28/2025, 1:32:36 AM

धर्मवीर बलिदान... माझ्या राजाचा त्याग... समर्पण चंद्र-सूर्य असेपर्यंत कायम राहील...! Facebook - https://www.facebook.com/share/v/1FGsuWiUuZ/ Instagram - https://www.instagram.com/reel/DGmRtTdIkaM/?igsh=NHo0azN3YzZlNnR3

🙏 ❤️ 👍 🙇‍♂️ 19
Mahesh Landge
Mahesh Landge
2/28/2025, 8:45:05 AM

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे संभाजीराजांचा जगातील सर्वांत उंच पुतळा अर्थात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ चे काम प्रगतीपथावर आहे. महाराजांच्या पुतळ्याचे आज पाद्यपूजन करण्यात आले. योगायोगाने आजपासूनच आपल्या राजाचा बलिदान मास सुरू होतो आहे. देव-देश अन्‌ धर्मासाठी मरावे कसे..? याची शिकवण देणाऱ्या महाराजांचे कार्य अजरामर आहे. त्याची प्रेरणा सदैव या शंभूसृष्टीमधून मिळेल, असा विश्वास वाटतो. त्याग-समर्पण- बलिदानाची प्रेरणा म्हणजे ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ https://www.facebook.com/share/p/1E9QXHj79Q/

❤️ 🙏 👍 🚩 💋 😂 40
Mahesh Landge
Mahesh Landge
2/28/2025, 12:51:39 PM

*स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण* बुधभूषणकार, धर्मशास्त्रपंडित, ज्ञानकोविंद स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर, गुणवीर, ज्ञानवीर, अजिंक्ययोद्धा रणधुरंधर शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा *‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’* चे पाद्यपूजन. 🚩🚩🚩 स्थळ : बोऱ्हाडेवाडी, मोशी, पिंपरी-चिंचवड, पुणे.

❤️ 🙏 🚩 👍 🌍 70
Video
Mahesh Landge
Mahesh Landge
2/28/2025, 12:36:11 PM

*स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण* बुधभूषणकार, धर्मशास्त्रपंडित, ज्ञानकोविंद स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर, गुणवीर, ज्ञानवीर, अजिंक्ययोद्धा रणधुरंधर शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’चे पाद्यपूजन. स्थळ : बोऱ्हाडेवाडी, मोशी, पिंपरी-चिंचवड, पुणे. Facebook - https://www.facebook.com/share/v/15mtZfRHp9/ Instagram - https://www.instagram.com/p/DGndaRdhAiN/

❤️ 🙏 👍 👏 🚩 23
Mahesh Landge
Mahesh Landge
2/28/2025, 5:41:51 AM

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ पाद्यपूजन *📍मोशी, पिंपरी-चिंचवड । Live* https://www.facebook.com/share/v/1BKDteGABg/

🙏 ❤️ 👍 🚩 23
Mahesh Landge
Mahesh Landge
2/27/2025, 12:31:31 PM

‘छावा’’ चित्रपट आपल्या कुटुंबाला- मुलांना दाखवाच..! Facebook - https://www.facebook.com/share/v/1HCQUCKYuo/ Instagram - https://www.instagram.com/reel/DGk4py-pTtb/

👍 🙏 ❤️ 🚩 🌍 🫡 44
Link copied to clipboard!