Ajit Pawar

45.4K subscribers

Verified Channel
Ajit Pawar
February 25, 2025 at 01:08 PM
जनहिताचे, राज्याच्या विकासाचे निर्णय घेण्यास महायुती सरकार तत्पर.. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय : ✅ पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता. (विधी व न्याय विभाग) ✅ ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यासाठी परवानगी. (वित्त विभाग) ✅ १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय; अशा ३३२ गावठाणासाठी ५९९.७५ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी. (मदत व पुनर्वसन विभाग) ✅ महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता; राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती. (नियोजन विभाग) ✅ बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी ५६४.५८ कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजुरी. (कृषि व पदुम विभाग) ✅ परळी, जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी ५६४.५८ कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजुरी. (कृषि व पदुम विभाग) ✅ महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम १८(३) १९५५ मध्ये सुधारणा, तसेच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश २०२५ ला मान्यता. https://x.com/AjitPawarSpeaks/status/1894372304530124924?t=MikrSjFC8zX6zzrQr83-PQ&s=19
👍 ❤️ 🙏 ✌️ 💐 16

Comments