Ajit Pawar

45.4K subscribers

Verified Channel
Ajit Pawar
February 25, 2025 at 01:12 PM
नुकत्याच पार पडलेल्या 'कृषिक-२०२५' , बारामती येथील कृषी प्रदर्शनात सहभागी शेतकरी आणि पशुपालकांनी माझ्याकडं पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावेळी मी सर्व शेतकरी आणि पशुपालकांना त्याबद्दल सकारात्मक शब्द दिला होता. आज महिन्याभरात सर्व प्रक्रिया पूर्ण करून राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत बारामती आणि बीड येथे दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयं उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. शेती आणि शेतीपुरक व्यवसायांना चालना देण्यासाठी आणि पशुपालन व दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. आजच्या बैठकीत पुणे आणि बीड जिल्ह्यांमध्ये दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयं स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या महाविद्यालयांसाठी एकूण ११२९.१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून बारामतीतील कऱ्हावागज येथे ८२ एकर आणि परळीच्या लोणी येथे ७५ एकर जागेवर शासकीय महाविद्यालयं उभारली जातील. या निधीतून प्रगत संशोधन केंद्रे, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि शेतीविषयक सुविधा उभारल्या जातील. दोन्ही महाविद्यालयांसाठी ९६ शिक्षक संवर्गातील आणि १३८ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी नियमित पदं मंजूर केली गेली आहेत. याशिवाय बाह्यस्त्रोतांद्वारे प्रत्येकी ४२ पदं मानधन तत्त्वावर भरण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळं राज्यातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून, या नवीन महाविद्यालयांमुळं प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढेल, अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधांची उपलब्धता अधिक सुलभ होईल आणि राज्यभरातील पशुसंवर्धन सेवा अधिक मजबूत होईल. हा निर्णय कृषिपूरक व्यवसायांना चालना देईल आणि राज्यातील पशुधन संगोपनासाठी नव्या संशोधन व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मार्ग मोकळा करेल, असा मला विश्वास आहे. https://x.com/AjitPawarSpeaks/status/1894365093661675676?t=FAxa3Ya14cgHSGQO3MufwA&s=19
👍 ❤️ 🙏 💵 😮 35

Comments