देव, देश, धर्म संस्कृती..!
February 20, 2025 at 07:51 AM
सेक्युलर महाराज, सुरतची मोहीम (1664)आणि आग्र्याहून सुटका..!(1666)
इतिहास तारखांनुसार वाचला तर बऱ्याच घटनांची संगती जुळून येते!
स्वराज्याच्या बांधणीसाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी महाराजांनी सुरत चा महापौर इनायत खानाकडेच खंडणीची मागणी का केली असेल?
व्यापारिक दृष्ट्या हिंदुस्तानच्या नकाशावर अनन्यसाधारण महत्व असलेले तापी तिरावर वसलेले आणि समुद्रमार्गासाठी मोक्याचे ठिकाण असलेल्या सुरतमध्ये याआधीच डच आणि पोर्तुगीजांनी बस्तान बसवले होते.
सोबतच ईस्ट इंडीया कंपनीने देखील या भागात हातपाय पसरायला सुरूवात केलेलीच होती.
औरंगजेबासह या सर्व परकीय शक्तींना त्यावेळी कर्ज देणारा सुरतचा व्यापारी वीरजी व्होरा जगातील सर्वात श्रीमंत व्यापारी म्हणून प्रसिद्धीस आला होता. व्यापारी कारणांमुळे या सर्व परकीयांशी तो चांगले संबंघ ठेऊन होता.
स्वराज्यावरील आक्रमणासाठी म्हणजे सैन्याचा खर्च आणि दख्खनच्या स्वारीसाठी औरंगजेबाने याच्याकडूनच एक कोटीचे कर्ज घेतलेले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमके कंबरडे मोडायचे ठरवले आणि या सर्वांचा आर्थिक कणा असलेल्या सुरतवर घाव घातला.
या हल्ल्याची दुसरी बाजु ही देखील आहे की सुरत हे हिंदुस्तानातून मक्केला जाण्याचे प्रवेशद्वार मानले जाई. धार्मिकदृष्ट्या मोगलांसाठी महत्वाचे ठाणे. हजला जाण्यासाठी होणारी मोठी उलाढाल देखील सुरतच्या उत्पन्नाचा एक स्त्रोत होता.
महाराजांनी सुरतवर पहीले आक्रमण केले 1664 साली... वर्मावर घाव बसल्याने चिडलेल्या औरंगजेबाने अनेक सरदारांकरवी महाराजांना रोखण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरल्यानंतर मिर्जाराजे जयसिंग या राजपूत सरदाराला दीड लाख फौजेसह दख्खनवर स्वारीसाठी पाठवले. मे 1665
जुन 1665 मध्ये महाराजांनी तुर्तास माघार घेण्याचे ठरवून पुरंदरला वेढा देणाऱ्या जयसिंगसोबत तहाची बोलणी सुरू केली.
अनेक पत्रे लिहून धर्माची आण घालून महाराजांनी आतापर्यंत जयसिंगाचे मनपरिवर्तन करून हिंदुत्वाच्या दृष्टीने अनुकूल भुमिका घेण्यासाठी मन वळवण्यात यश मिळवले होते. (ही पत्रे जयपुर संग्रहालयात उपलब्ध आहेत)
तु जर बादशहा होणार असशील तर तुझ्या दरबारी मांडलिकत्व करण्यास मी तयार आहे मात्र तुर्की इस्लामीक राजवटीसमोर मी कदापी झुकणार नाही अशा आशयांची ती पत्रे होती.
त्याचमुळे राजांना मृत्युदंड देण्यासाठी औरंगजेबाने पाठवलेल्या जयसिंगांनी तह करून महाराजांना आग्रा पेशीसाठी आणण्याचे वचन औरंगजेबाला दिले आणि त्याला यासाठी तयारही केले.
तहाच्या बोलणीनुसार स्वराज्यातील 23 किल्ले औरंगजेबास देण्याचे ठरले व आग्रा पेशी होईपर्यंत युवराज संभाजीराजेंना जयसिंगाकडे ओलीस ठेवण्याचे राजांनी मान्य केले.
यानंतर आग्रा कैद ते सुटका हे प्रसंग मे 1666 ते ॲागस्ट 1666 दरम्यानच्या काळात येतात.
🖌️🖌️🖌️Rahul Premraaj Bhosale
👍
❤️
🙏
23