आरंभ - सुरवातीचे क्षण मोलाचे
February 20, 2025 at 09:37 AM
https://youtube.com/shorts/lQDqTfjd3E0 _*कृती : ठश्यांची जादू*_ घरामध्ये उपलब्ध असलेल्या उदा. कुंकू, नीळ, गुलाल, हळद, शेंदूर इत्यादी विविध रंगांच्या मदतीने पालकांनी बाळासोबत बाळाच्या तसेच पालकांच्या बोटांचे, हातांचे वेगवेगळ्या पानाफुलांचे ठसे उमटवावे व त्यापासून एखादी चित्रकृती तयार करावी आणि त्या सर्व कृती करताना त्याविषयी बाळाशी बोलावे. _*बौद्धिक पार्श्वभूमी :*_ कृती करताना बाळाच्या बोटांचा, हातांचा तसेच डोळ्यांचा वापर होतो त्यामुळे बाळाच्या बोटांच्या स्नायूंचा तसेच दृष्टीचा विकास होतो. बाळाला वेगवेगळे रंग, आकार समजतात. तयार झालेल्या ठश्यांपासून चित्र तयार केल्यामुळे कल्पना शक्ती वाढते. कलेविषयी आवड निर्माण होण्यास मदत होते. एका जागेवर बसून कृती करण्यामुळे एकाग्रता वाढीस लागते. _*धन्यवाद !*_ 😊🙏 _*आरंभ - सुरुवातीचे क्षण मोलाचे*_
👍 😮 6

Comments