आरंभ - सुरवातीचे क्षण मोलाचे
February 27, 2025 at 07:49 AM
विकासाचे टप्पे - १८ व्या महिन्यांपर्यंत ! | Developmental Milestones - upto 18 months https://youtu.be/ORSk570ezIc विकासाचे टप्पे - १८ व्या महिन्यांपर्यंत ! वाढ आणि विकास ही एक सातत्याने होणारी महत्वाची प्रक्रिया आहे. विशिष्ट वयोगटामध्ये बाळाने विशिष्ट गोष्टी करणे अपेक्षित असते यालाच “विकासाचे टप्पे” असे म्हणतात. या विडिओ मध्ये आपण १८ महिने म्हणजेच दीड वर्षापर्यंत (१ १/२) वयाच्या, बालकांच्या विकासाचे टप्पे बघणार आहोत. “१८ महिने” या वयापर्यंत असणारे बहुतांश बालक काय करतात ? १. उभे राहून काही पावले स्वतंत्रपणे चालतात. २. टाटा करणे, टाळ्या वाजविणे यासारख्या विविध परिचित क्रिया करतात. ३. छोटे खडे/ छोट्या वस्तु डब्यात टाकतात. ४. पुस्तकातील वस्तु आणि त्यांची चित्र पाहून ते ओळखतात आणि त्यांचे नावे सांगतात. त्यामुळे १८ महीने पर्यंत वयातील तुमचे बाळ या गोष्टी करू शकते की नाही याचे अवश्य निरीक्षण करा. आणि १८ महिने पूर्ण होऊनसुद्धा जर बाळाला … * आधाराशिवाय स्वत:हून उभे राहू न शकणे. * छोट्या वस्तु डब्यामध्ये टाकता न येणे. * ‘बाळा तुझं खेळणं कुठे आहे...दाखव बरं !’ असे म्हटल्यावर वस्तुकडे बोट न दाखवणे. * ‘आई, बाबा, दादा’ यासारखे साधे शब्द बोलता न येणे. * मातेने केलेल्या हातवाऱ्यांना प्रतिसाद न देणे आणि बालक स्वत:च्याच जगात मग्न असणे. * दैनंदिन कार्यासाठी दोन्ही हातांचा वापर न करणे. (म्हणजे एकाच हाताचा वापर करण्यास प्राधान्य देणे.) यापैकी कोणतीही बाब आढळून आल्यास ते “धोक्याचे संकेत” आहे हे समजून त्वरित जवळील आशा ताई, अंगणवाडी ताई, आरोग्य कर्मचारी किंवा तज्ञ आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. धन्यवाद ! आरंभ - सुरुवातीचे क्षण मोलाचे
👍 🙏 4

Comments