लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान
February 20, 2025 at 04:11 AM
*#लैंगिक_आरोग्य -भाग 2* *#लैंगिक_शिक्षण* https://whatsapp.com/channel/0029VaAlVfn7j6gFqGrpl72t लैंगिक शिक्षण किती गरजेचे आहे हे कुटुंब कलह,अनेक वैवाहिक समस्या,लैंगिक शोषण हे पहिल्यानंतर कळते. माझ्या नात्यात एक जोडपे आहे.मुलगा स्मार्ट,हुशार,वेलसेटल्ड आणि मुलगी सुंदर ,खानदानी (लोकांच्या मते ),सुसंस्कारी(म्हणजे कधीच एकटी न फिरणारी,का व कसे असे प्रश्न न विचारणारी,भूमिका योग्य असली तरी वडीलधाऱ्यांना विरोध न करणारी ,घरातील कामात सतत मग्नआणि ख़ाली मान घालून शाळा ,कॉलेज करणारी)तर त्यांचे लग्न झाल्यानंतर मस्त उटी, म्हैसुर,बेंगलोरला हनिमूनला गेले .पण मुलगी मख्ख ,कसलाच रिस्पॉन्स देत नव्हती .की खळखळून हसणे नाही की मोकळे वागणे बोलणे नाही.मुलगा वैतागुन गेला. घरी परत आल्यानंतर ती आदर्श सुन घरातील सगळे काम करायची,सगळ्यांचा आदर सन्मान,बेडरूम मध्ये गेली की मख्ख . सिनेमा बघताना गप्प गप्प तरी किंवा झोपुन जाईल.कॉमेंट्स करणे,विनोद करणे किंवा त्याला प्रतिसाद देणे नाही.शेवटी मुलगा म्हणाला मला घटस्फोट हवा.लोकांना कळेना एवढी सुंदर ,सुशिल पत्नी आणि याला काय झाले.बरं त्या मुलीला आपली नेमकी काय चुक झाली हे ही समजत नव्हते.ती फक्त रडायची. चुक दोघांची पण नाही.जरी आजकाल मुली बदलल्या असल्या तरी ते प्रमाण खुप कमी आहे आणि आता 40 शी ओलांडलेल्या महिलांची स्थिती तर त्यावेळी याहून वेगळी नव्हती(काही अपवाद) ना मुलींना कधी मुलांत मिसळू दिले जाते,न कधी हिंडण्या फिरण्यासाठी सैल सोडले जाते.तिला समजावून सांगून ,योग्य लैंगिक शिक्षण देण्याऐवजी बंधन घातले जाते.सिनेमात जरा बोल्ड दृश्य असतील तर टी व्ही बंद केला जातो.मोबाईल वर एखादा किसिंग सीन जरी मुलगी बघत असेल तर घरात स्फोट होतो.तिची आज्जी,आई,मावशी कोणीही विवाहोत्तर लैंगिक जीवनावर चर्चा करत नाहीत.“चट समजत होतं ,आम्हाला काय कोणी सांगायला होतं का ?” ही भूमिका असते त्यांची. जर याविषयावर बोलेचच नाही तर माहिती कोठुन मिळणार.लैंगिक आनंद घ्यायचा म्हणजे काय करायचे.समागम करताना रिस्पॉन्स द्यायचे म्हणजे नेमके काय करायचे ? हे तिला कसे आणि कोठुन समजणार आणि समागम करताना आनंद मिळत असेल तरी पहिल्या पासुन ती गोष्ट घाणेरडी आहे हे बिंबवल्यामुळे ती बोलून पण दाखवु शकत नाही. ओट्यावर बसुन एकमेकींना चावट टोमणे मारणे म्हणजे लैंगिक शिक्षण नव्हे. त्यामानाने मुलांची स्थिती चांगली आहे.त्यांना मित्रांमधुन,कसली तरी स्टॅंड वरची पुस्तकं वाचुन किंवा कधीतरी पॉर्न पाहून माहिती मिळते.पण ती योग्य दिशा नव्हे.पण त्यामुळे त्याच्या लैंगिक जीवनाच्या अपेक्षा पत्नी/गर्लफ्रेंड कडून जास्त वाढतात.ती मात्र अजुन त्यापासून लांबच असते.तिला तिथंपर्यन्त रुंजी घालवत आणावे लागते हा खरं तर निसर्ग नियम पण आहे.पण आपल्या याबाबत असलेल्या चुकीच्या रूढ़ी परंपरा .त्यामुळे याबाबत त्यांना आधी मानसिक दृष्टया तयार करणे गरजेचे आहे.तर तुमचा सेक्स चांगला होईल. लैंगिक शिक्षण हे निकोप लैंगिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी खुप गरजेचे आहे.तुमचे लैंगिक जीवन निकोप असेल तर तुमचे मानसिक स्वास्थ्य पण चांगले रहाते.तुमच्या जोडीदारा मध्ये आणि तुमच्यामध्ये दृढ़ नाते निर्माण होते.त्यामुळे जीवनात येणाऱ्या अडचणीना पण तोंड देणे सोपे जाते. सेक्स मध्ये इंटरेस्ट घेतल्यामुळे तुमचे आरोग्य पण चांगले रहाते.सेक्सची इच्छा आहे पण करताना अडचणी आहेत.जोडीदाराची साथ नसते नकार असतो, स्त्रीला ऑर्गेझम मिळत नाही अशावेळी कंबर,डोके दुःखी,अंग दुःखी,कामात उत्साह न वाटणे,चिंता वाटणे,असुरक्षित वाटणे इ. समस्या निर्माण होतात. आपल्या जोडीदाराला समजून घ्या.लैंगिक जीवनाचा आनंद घ्या.एकमेकांना योग्य भाषेत ,एकमेकांचा अपमान न करता गरजा सांगा. खुपदा ग्रामीण भागात तरी नवरा ,बायको मध्ये एकजण चाळीशी ओलांडली की सेक्स लाइफ बद्दल उदासीन होतो .मुलं मोठी झालेत .आता सुना ,जावई यायचं वय झालं अन अजुन आपलच सुरु ठेवणं योग्य नाही असं वाटतं. पण जोडप्यानी ठरवले तर खुप काळ पर्यन्त ते लैंगिक जीवनाचा अस्वाद घेवू शकतात. सगळ्यात महत्वाचं मानवी गरज आणि मानवाधिकार म्हणून लैंगिक ज्ञान हवे . सामाजिक सुव्यवस्था म्हणून लग्न बंधन हवे असेल तर लैंगिक कामपूर्ती ही जबाबदारी घ्यावी अन्यथा विवाह बाह्य संबंध मान्य करावे. ©️ #प्राजक्ता_पाटील
Image from लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान: *<a class="text-blue-500 hover:underline cursor-pointer" href="/hashta...
👍 ❤️ 👌 🎉 😢 🙏 37

Comments